Headlines
Loading...
सामाजिक जाणीव असलेल्या साध्या कार्यकर्त्याकडून गरजवंत विद्यार्थ्यांना ५० स्कूल बॅग्स व महिना पुरेल एवढे राशन देऊन वाढदिवस साजरा

सामाजिक जाणीव असलेल्या साध्या कार्यकर्त्याकडून गरजवंत विद्यार्थ्यांना ५० स्कूल बॅग्स व महिना पुरेल एवढे राशन देऊन वाढदिवस साजरा

 

पुणे, दि. १९ (चेकमेट टाईम्स): आज अनेक तथाकथित लोकप्रतिनिधी अनाथाश्रम, वृद्धाश्रमांमध्ये त्यांच्या आर्थिक परिस्थितीच्या अगदी अत्यल्प प्रमाणात मदत देऊन वाढदिवस साजरे करतात आणि सोशल मिडिया आणि माध्यमांमध्ये स्वत:ची छबी झळकावून घेतात. मात्र कोंढवे धावडे मधील बलुतेदार समाजाचा एक सामान्य कुटुंबातील कार्यकर्ता त्यांच्या तोडीस तोड, किंबहुना त्यांच्याहून अधिक म्हटले तर वावगे ठरणार नाही, एवढे मोठे काम सातत्याने करत असून, त्यात तसूभरही कमी झालेली नाही. गणेश उर्फ गंगाधर राऊत असे त्या सामाजिक कार्यकर्त्याचे नाव असून, त्याने त्याच्या उत्पन्नापेक्षा कित्तेक पटीने अधिक रकमेचे साहित्य गरजवंतांना वाटून समाजासमोर एक आदर्श उभा केला आहे.

 

कर्तव्यांची दृष्टी, दिव्यांगांच्या प्रति राखली विवेकबुद्धी, हीच वाढदिवसाची पूर्ती... या उक्तीला साजेसे कार्य गणेश राऊत यांनी केले आहे. गणेश राऊत हे छावा संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता आहेत. तसेच शिवबांचा छावा म्हणून देखील त्यांची ओळख आहे. त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त श्री साई सेवा दिव्यांग मुलांची शाळा शिवणे येथे छावा क्रांतिवीर सेना व ओम साई फौंडेशनच्या माध्यमातून दिव्यांग मुलांना ५० स्कूल बॅग्स व एक महिना पुरेल एवढे राशन माजी नगरसेवक हरिश्चंद्र दांगट, समाजसेवक उमेश कुंभार यांच्या हस्ते देत आपले सामाजिक दायित्व सिद्ध केलंय.

 

यावेळी आशिष खंडेलवाल, उमेश कुंभार, रासपचे पुणे शहर युव अध्यक्ष, आजारी रुग्णाच्या पूर्ण कुटुंबाला अडचणीत साथ देणारे व्यक्तिमत्व उमेश कोकरे, मनीषा पाटील, वैशाली पाटील, विद्या हांडे, अनिता पैठणपगार, डोंगरे मामा, संदिप वांजळे, संतोष कदम, प्रशांत मस्के, प्रमोद गोळे, अमिन आगा, धीरज पाटील यांच्यासह गणेश राऊट यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. अशा कार्यकर्त्यांना लोकप्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाल्यास मतदारांना खऱ्या अर्थाने नगराची सेवा करणारा हक्काचा व्यक्ती मिळू शकतो अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

 

माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्युबवर फॉलो करा...!

आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes

आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आमच्या इंस्टाग्राम’ची लिंक :  https://www.instagram.com/checkmate_times/

0 Comments: