Type Here to Get Search Results !

जलतरण तलावामध्ये पडलेल्या भेकराला प्राणीमित्रांनी दिले जीवदान

 



पुणे, दि. २० (चेकमेट टाईम्स): खाजगी बंगल्याच्या आवारात असलेल्या खाजगी जलतरण तलावात पडलेल्या भेकरास जीवदान देण्यात प्राणीमित्रांना यश आले आहे. सुदैवाने तो जलतरण तलाव रिकामा असल्याने त्या भेकाराचा बुडून दुर्दैवी अंत झाला नाही.

 पुण्यातील भिडे पुलाखालच्या “त्या मगरीचे” रहस्य उलगडले; पालिकेच्या आरोग्य निरीक्षकाने लावला शोध

याबाबत प्राणीमित्र आणि पुणे जिल्हा वन्यप्राणी व सर्परक्षक असोसिएशनचे अध्यक्ष विनायक मुगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज मंगळवार २० जुलै २०२१ सकाळी १० वाजताच्या सुमारास मुळशी तालुक्यातील रीहे येथील पडळगरे वाडी येथून आनंद पडळगरे याच्या बंगल्याच्या आवारात असलेल्या जलतरण तलावामध्ये भेकर पडले आहे, अशी माहिती फोन द्वारे मुगडे यांना मिळाली.

 बिबट्या वाघांची तस्करी करताना रंगेहाथ पकडले तीन तस्कर; पुणे ग्रामिण पोलिसांची कामगिरी

भेकाराबाबत माहिती मिळताच मुगडे आपले सहकारी निहाल पायगुडे, कुंदन रिठे, अथर्व बहिरट, यशराज कदम, आकाश झोंबाडे यांनी वेळेचा विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान भरे पौड वनविभागाचे अधिकारी संतोष भिलारे यांना सोबत घेऊन प्राणिमित्रांची टीम घटनास्थळी पोचली. यावेळी भेदरलेल्या त्या भेकरास सुरक्षितरीत्या पकडून पौड वनविभागाच्या हद्दीत सोडले. सदरील मादी जातीचे भेकर अंदाजे १० ते १२ किलो वजनाचे होते, अशी माहिती मुगडे यांनी दिली.

 त्यांनी कापले हत्तीचे दात; उच्चशिक्षित तरुणांची तीन कोटी रुपये कमावण्यासाठी नामी शक्कल

माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्युबवर फॉलो करा...!

आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes

आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आमच्या इंस्टाग्राम’ची लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/

 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.