Headlines
Loading...
वारजे मधील चित्रपट क्षेत्राशी संबंधित खाजगी सावकार खंडणी विरोधी पथकाकडून गजाआड

वारजे मधील चित्रपट क्षेत्राशी संबंधित खाजगी सावकार खंडणी विरोधी पथकाकडून गजाआडपुणे, दि. १६ (चेकमेट टाईम्स): दिग्दर्शक व नाट्य लेखक असताना बेकायदेशीर खाजगी सावकारी करणाऱ्या एका विरोधात डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला पुणे शहर पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे.

 किल्ले रायगडच्या टकमक टोकाखाली गाडले होते दीड कोटींचे दागिने; चार जण गजाआड

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार रावेतमधील खासगी रुग्णालयात पीआरओ म्हणून काम करतात. ते आणि त्यांच्या पत्नी आजारी होते. त्यामुळे त्याला दरमहा २८ हजार रुपये खर्च येत होता. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट होती. त्यांना पैश्यांची गरज असल्याने त्यांनी २०१८ मध्ये मित्राकडे पैसे मागितले. तर सांगवी येथील एका मित्राने त्यांना वारजे मधील चित्रपट क्षेत्राशी संबंधित मित्र हा व्याजाने पैसे देत असल्याचे सांगितले. त्यानुसार फिर्यादिनी त्याची भेट घेऊन ६ लाख रुपये ५ टक्के व्याजाने घेतले होते. त्याबदल्यात फिर्यादीनी त्याला व्याज व मुद्दल असे ७ लाख ४० हजार दिले होते.

 विनोदी आणि विसंगत कथानक असलेल्या 'ढिशक्याव' चित्रपटाचे पाठमोऱ्या पोस्टरचे गुपित लवकरच उलगडणार

असे असताना देखील त्याने फिर्यादीकडे ७ लाख २० हजार देण्यासाठी तगादा लावला होता. तसेच त्याने पैसे न दिल्यास शिवीगाळ करत व कुटुंबाला त्रास देईन, अशी धमकी देत होता. दररोज २ हजार रुपये द्यावे लागतील, अश्या धमक्या देत होता. याबाबत फिर्यादीने खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार केली होती. त्यानुसार रविराज साबळे (वय.३६) यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करत, शंतनू वसंत पांडे (वय.४५ रा.वारजे माळवाडी, पुणे) याला अटक केली आहे. या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे, याची पोलीस माहिती घेत आहेत.

 कोयता पॅटर्न मोडीत काढण्यासाठी पुणे शहर पोलिसांनी बहु सरसावल्या; २२५ कोयात्यांसह पाच जण गजाआड

सदरील कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह आयुक्त डॉ रवींद्र शिसवे, अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहाय्यक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, पोलीस अंमलदार संपत अवचरे, विजय गुरव, शैलेश सुर्वे, सुरेंद्र जगदाळे, राहुल उत्तरकर, सचिन अहिवळे, संग्राम शिनगारे, प्रविण पडवळ, भुषण शेलार, मोहन येलपल्ले, रुपाली कर्णावर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

 आत्महत्या करण्याबाबत काय म्हणते टीम मुळशी पॅटर्न; स्वप्नील शिंदे आत्महत्येनंतर व्यक्त झाली टीम

माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्युबवर फॉलो करा...!

आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes

आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आमच्या इंस्टाग्राम’ची लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/

 


0 Comments: