Type Here to Get Search Results !

सायकलस्वाराच्या वेशात पुण्यातले वारकरी पंढरपूरात; पायी वारी ऐवजी केली सायकल सवारी, वाचा त्यांच्या प्रवासाची दुनियादारी

 

पुणे, दि. १७ (चेकमेट टाईम्स): कोरोनामुळे यावेळीही लाखो वारकऱ्यांची पंढरीची पायी वारी चुकली. त्यातल्या काहींनी पायी वारी करण्याचा प्रयत्न केला. त्यातले काहीजण पंढरपुरात पोचले, तर काहींना पोलिसांनी ठिकठिकाणी अडवले. मात्र शिवबांचे पायिक असलेले काही वारकरी गनिमी कावा करून विठुरायाच्या चरणी लीन झालेच. त्यातीलच एक वारकरी जत्था पुण्यातील खडकवासला विधानसभा मतदार संघातील होता. २० तास सायकल चालवून त्यांनी ४५० किलोमीटर अंतर सायकलिंग करत पुणे – पंढरपुर – पुणे प्रवास केलाय. वारजे भागातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ह.भ.प. रामदास चौधरी, नांदेड सिटीचे रहिवासी निलेश साबळे, अविनाश बांदल, रविराज कुलकर्णी यांनी पांडुरंगाचे नाव घेऊन हा पराक्रम केलाय.

पंढरपुरच्या वारकऱ्यांना या आजारांना सामोरे जावे लागते

याबाबतचा अनुभव सांगताना ह.भ.प. रामदास चौधरी म्हणाले, बुधवार दि.१४ जुलै २०२१ च्या पहाटे ३ वाजून १५ मिनिटांनी या पंढरीच्या वारीला सुरुवात केली. तर मजल दरमजल करत आम्ही दुपारी 3.30 वाजता विठोबा चरणी पोचलो. पहिला दिवस अन ताजा दम असल्यामुळे पहिल्या दिवशीचा 220 किमी चा प्रवास आम्ही साडे नऊ तासात पूर्ण केला. इतका लांबचा प्रवास करूनही त्या सावळ्या विठू माऊलीचे दर्शन घेताच शरीराचा सर्व थकवा कुठल्या कुठे पळून गेला, जणू त्या माउलीनेच आम्हाला दर्शनासाठी बोलावले होते. त्यामुळे गेल्या वर्षी प्रमाणे यावर्षी आपली पायी वारी चुकली असली तरी, पांडुरंगाचे दर्शन झाल्याचे आपल्याला अवर्णनीय समाधान लाभल्याचे चौधरी यांनी सांगितले.

 पांडुरंगाच्या दर्शनाबाबत शरद पवार यांचे महत्वपूर्ण विधान

पांडुरंगाचा आशीर्वाद घेऊन परत फिरताना, “हे विठूराया पुढच्यावेळी पुन्हा पाहिल्यासारखे पायी वारीचे दिवस आण, वारकऱ्यांना दे आषाढीचे वाण” हे मागणे मागितल्याचे रामदास चौधरी सांगतात. दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजता पुण्याच्या दिशेने परतीचा प्रवास चालू केला. सलग दुसऱ्या दिवशी आम्हाला तेवढाच प्रवास निर्विघ्नपणे पार करायचा होता. मात्र जाताना असलेला उत्साह माघारी फिरताना नव्हता. पंढरी मधुन पाय निघत नव्हते. त्यामुळे “जी आस विठुरायाच्या दर्शनाची होती, तेवढी घरी येण्याची नव्हती असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही”. त्यामुळे परत पुण्यात पोचण्यास आम्हाला रात्रीचे 9.30 वाजले होते. जाताना साडेनऊ तासात उरकलेल्या प्रवासाला, येताना मात्र अकरा तास लागले. त्यामुळे पांडुरंगाच्या दर्शनाची उर्जेने आम्हाला पंढरपूरकडे दीड तास अगोदर खेचून नेले, असेही म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

 बाळूमामांच्या पालखी बरोबर चालतायत साक्षात खंडेराय | देवदत्त नागे चालत निघालेत पंढरपूरला

कोरोनामुळे यावर्षीही वारीत चालत जायची आशा मावळली होती. त्यातून आमच्या सायकलिंग ग्रुपमध्ये चर्चा केली. पण दोन्ही बाजूंचा प्रवास सायकलने करायचा निश्चय होता. त्यामुळे काहीजण तयार झाले. साधारणतः दोन महिन्यांपासून पंढरपूर सायकल वारी करण्याचा मानस झाला. त्या दिवसापासून पंढरीच्या वारीचा आराखडा आखायला सुरुवात केली. तारीख ठरली, मोर्चेबांधणी चालू झाली, आठवड्यातून दोन वेळा 80 ते 100 किमी सायकल प्रवास चालू केला. त्यात मग सिंहगड सुद्धा काही वेळा सायकल वरून सर केला. नियमित सायकल सराव, ट्रेकिंग ,चालणे याचा समतोल राखीत आम्ही पंढरपूर सायकल वारी साठी सज्ज झालो आणि ही वारी यशस्वी ठरली.

 न्यूझीलंडच्या तरुणाला आस विठुरायाच्या दर्शनाची, निघाला पायी पंढरीसी

त्यात फक्त एकच आमचा अशोक लोंढे नावाचा मित्र या वारीला येऊ शकला नाही. अशोक लोंढे आणि आम्ही सायकलिंग ग्रुपची सुरुवात करणारे आरोग्यप्रेमी आहोत. मात्र त्याच्या निकटवर्तीयांचे आकस्मित निधन झाल्याने त्याला या वारीला येता आले नाही. त्याची हुरहूर त्याच्यासह आमच्याही मनात आहे. अशोक लोंढे बरोबर आम्ही हजारो किलोमीटर सायकल चालवली आहे. त्यामुळे त्याची अनुपस्थिती जाणवण्यासारखी होती, असेही रामदास चौधरी यांनी आवर्जून सांगितले. एकूणच सायकलिंग करून स्वत:चे आरोग्य सुदृढ करा असा संदेश या चारही सायकलिंग वारकऱ्यांनी दिलाय.

 इथे लाखो वारकऱ्यांना होत आहे सुदाम्याचे पोहे, बुंदी, चहाचे वाटप | पालखी मार्गावरील सर्वात मोठे वाटप

माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्युबवर फॉलो करा...!

आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes

आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आमच्या इंस्टाग्राम’ची लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.