Type Here to Get Search Results !

सिंहगड रोडवरील टोळीवर दुसऱ्यांदा मोक्काची कारवाई; आयुक्ताचा मोक्कावर धडाका चालूच

 

पुणे, दि. १७ (चेकमेट टाईम्स): पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी परिमंडळ ३ मधील वारजे पोलीस स्टेशन हद्दीत ३८ वा मोक्का लावल्यानंतर आता परिमंडळ ३ मधीलच सिंहगड रोड पोलिस ठाणे हद्दीत ३९ वा मोक्का नोंद करत आपली मोक्का कारवाई सुरूच ठेवली आहे. सिंहगड रोडवरील महेश ऊर्फ बंटी प्रकाश पवार याच्यावर लावलेला हा दुसरा मोक्का आहे. आयुक्तांच्या कारवाईच्या या धडाक्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

 सिंहगड रोड खूनप्रकरणी 4 संशयित ताब्यात; फन टाईम समोर भर दुपारी झाला होता खून

याबाबत पुणे पोलीस आयुक्तालयाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार, सिंहगड रोड पोलिस ठाणे हद्दीत तुकाई नगर येथे राहणाऱ्या महेश ऊर्फ बंटी प्रकाश पवार यांने त्याच्या साथीदारांसह खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, दरोडा, जबरी चोरी, अपहरण, बलात्कार, बेकायदेशीर शस्त्र जवळ ठेवणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, दहशत निर्माण करणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे मागील काळात केलेले असल्याने त्याच्यावर 2015 मध्ये मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली होती. बंटी पवार हा येरवडा कारागृहातून जुलै 2019 मध्ये बाहेर सुटल्यानंतर, आपले अस्तित्व लपून राहू लागला होता. दरम्यान जेलबाहेर आल्यानंतर त्याने आपल्या साथीदारांना पुन्हा एकत्र करून, दोन खुनांच्या प्रयत्नाचे गंभीर गुन्हे केले आणि पसार झाला. पोलिसांनी त्याचा कसोशीने शोध घेऊन, त्याची लागलीच दाखल गुन्ह्यात अटक करून, पुन्हा ऑगस्ट 2019 मध्ये येरवडा जेलमध्ये रवानगी केली. परंतु covid-19 च्या प्रादुर्भावाचा फायदा घेत बंटी पवार न्यायालयातून जामीन घेऊन पुन्हा जानेवारी 2020 मध्ये येरवडा जेल मधून बाहेर सुटला होता.

 दहीहंडीच्या फ्लेक्स वरून वाद; सिंहगड रस्त्यावर एकाचा निघृण खून

आरोपी बंटी पवार याचा शोध घेत असताना पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून, त्यास 20 जून 2019 रोजी त्याचा साथीदार शुभम बबन वाघमारे याला ५ लाख 10 हजार 450 रुपये किमतीचा गांजा आणि रोख रकमेसह पकडले होते. त्याबाबत सिंहगड रोड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करून, त्याला अटक करण्यात आली होती. दाखल गुन्ह्याचा तपास करीत असताना, मुख्य आरोपी बंटी पवार यांचा वाघमारे याच्यासह गांजाच्या व्यवसायामध्ये आणखी एक साथीदार असल्याचे निष्पन्न झाले. त्याबाबत अधिक तपास करता त्याचा साथीदार प्रवीण बाळासाहेब ढाकणे याच्याजवळ 27 हजार रुपये किमतीचा १ किलो 200 ग्रॅम गांजा मिळून आल्याने त्यास अटक करण्यात आली होती.

 सिंहगड रोडला हसन शेखची ऑडी मोटार पेटवली; दोघे गजाआड

या आरोपींना न्यायालयात हजर करून, पोलिस कस्टडी घेऊन अधिक तपास करता यातील मुख्य आरोपी बंटी पवार यांच्या सांगण्यावरून सर्वांनी मिळून एकत्र येऊन गांजा विक्रीचा व्यवसाय सुरू केल्याचे निष्पन्न झाले. संबंधित आरोपींवर वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली असतानाही, आरोपींनी गंभीर गुन्हे केल्याने आरोपींविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण काय(मोक्का) कलमांचा समावेश करून मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव, सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांनी परिमंडळ ३ च्या पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांच्यामार्फत, अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग डॉ संजय शिंदे यांना सादर केला होता.

 सिंहगड रस्त्यावर मित्रानेच केला डोक्यात दगड घालून मित्राचा खून; मित्र फरार

सदर प्रस्तावाची छाननी केल्यानंतर, सदरील गुन्ह्यातील आरोपी बंटी पवार याच्या टोळीचे सदस्य म्हणून काम करत असून, त्यांनी संघटितरीत्या सदरचा गुन्हा केलेला आहे. संबंधित आरोपींनी संघटित गुन्हेगारी टोळी निर्माण करून एकट्याने व संयुक्तरीत्या स्वतःचे व टोळीचे वर्चस्व निर्माण करण्याकरता आणि त्यातून गैरवाजवी व आर्थिक व इतर फायदा मिळवण्याकरता गुन्हे केलेले आहेत. सदर संघटित गुन्हेगारी टोळीने आपले टोळीचे वर्चस्व व दहशत कायम ठेवण्याच्या उद्देशाने संघटित गुन्हेगारी कृत्य सातत्याने चालू ठेवले असल्याने, महेश उर्फ बंटी प्रकाश पवार (वय. ३६), शुभम बबन वाघमारे (वय. 26) आणि प्रवीण बाळासाहेब ढाकणे (वय. 19 सर्वजण रा. वडगाव बुद्रुक) यांच्याविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा कलमांचा समावेश करण्याबाबत डॉक्टर संजय शिंदे अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग यांनी मंजुरी दिल्याने, आरोपींविरुद्ध मकोका कायद्यांतर्गत पुढील कारवाई केलेली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास कोथरूड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त गजानन टोंपे हे करीत आहेत.

सिंहगड रोड, दत्तवाडी, वारजे पोलीस स्टेशन हद्दीत जुगार अड्ड्यांवर पोलिसांचे छापे; १४ जणांना अटक

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग डॉ. संजय शिंदे, परिमंडळ ३ चे पोलिस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड, सहाय्यक पोलीस आयुक्त पौर्णिमा तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंहगड रोड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक देविदास घेवारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रमोद वाघमारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले, पोलीस उपनिरीक्षक कुलदीप संकपाळ, पोलीस कर्मचारी प्रमोद कळमकर, मोहन भुरूक, आबा उत्तेकर, राजेश गोसावी, शंकर कुंभार, उज्वल मोकाशी, सचिन माळवे, दयानंद तेलंगे पाटील, पुरुषोत्तम गुंला, योगेश झेंडे, धनाजी धोत्रे, अविनाश कोंडे, राहुल शेडगे, किशोर शिंदे, रफिक नदाफ, सागर भोसले, गिरीश एकोर्गे, शैलेश चव्हाण यांच्या पथकाने केली आहे.

 सिंहगड रस्त्यावर भाचीचे लग्न दहा दिवसांवर असताना भावाने केला बहिणीचा खून; संशयित भाऊ फरार

पुणे शहर पोलीस दलाचा अमिताभ गुप्ता यांनी पोलीस आयुक्त म्हणून कार्यभार हाती घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष ठेवून असून, त्यांनी गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन होईल यावर अधिक भर देण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश केले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मोक्का अंतर्गत झालेली ही 39 वी कारवाई आहे.

 पुण्यातील नांदेड सिटी मध्ये मसाज पार्लरमध्ये वेश्याव्यवसाय; परदेशी तरुणींची सुटका

माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्युबवर फॉलो करा...!

आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes

आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आमच्या इंस्टाग्राम’ची लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.