Headlines
Loading...
काव्यानंद कट्ट्यावर रंगल्या पावसाच्या कविता; उलगडले पावसाचे रंग, स्वभाव आणि बरंच काही ! काय ते वाचा तुम्ही...!

काव्यानंद कट्ट्यावर रंगल्या पावसाच्या कविता; उलगडले पावसाचे रंग, स्वभाव आणि बरंच काही ! काय ते वाचा तुम्ही...!पुणे, दि. २६ (चेकमेट टाईम्स): “तू पाठवलेला पाऊस, अंगणात असा बरसाला, तुषार्त मी ही होते, जणू अमृत धन बरसला” या चारोळीत “पाऊस, प्रेम आणि तृप्ती’चा मिलाप होतोय”, मग अशा चारोळी’ने सुरुवात झालेल्या कवितांच्या कट्ट्यावर रंगत नाही भरणार तर काय? निमित्त होते “काव्यानंद कट्टा”च्या पहिल्या वहिल्या कट्ट्याचे.

 हे आहेत २०१९ निवडणूकीत सर्वाधिक मते मिळवलेले महाराष्ट्रातील टॉप १० खासदार

पुणे विद्येचे माहेरघर आणि या माहेरघरात अनेक राजकीय, कला, क्रीडा आणि सांस्कृतिक कट्टे भरतात. कोरोना महामारीमुळे या कट्ट्यांना स्वल्पविराम मिळाला होता. मात्र पुन्हा हे कट्टे हळूहळू रंगू लागले असताना, खेळांचा बादशहा, होम मिनिस्टर फेम बाळकृष्ण नेहरकर आणि पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे कोषाध्यक्ष राजेंद्र वाघ यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या “काव्यानंद कट्ट्याची” पहिली आषाढ काव्यमैफिल, सखी विद्या अटक यांच्या वरील “तू पाठवलेला पाऊस” या चारोळीने, वारजे येथील हॉटेल राजमुद्राच्या सभागृहात, राष्ट्रपती पोलीस पदक पुरस्कार विजेते सिताराम नरके यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

 पुण्यातील पर्वती टेकडीवर एक अशी आश्चर्यकारक वास्तु आढळली; अनेकजण धावतच पहायला जातील

साहित्यिक आणि कवी राजेंद्र वाघ यांनी सूत्रसंचालन केलेल्या या कविसंमेलनात सुप्रिया ताम्हाणे यांनी पाऊस स्पर्श आणि सोनेरी पिवळी उन्हे उतरली या कविता सादर केल्या. तर रुपाली करडिले यांनी त्यांच्या सारीपाट आणि आठवांची ओंजळ या कविता सादर केल्या. ज्यांच्या चारोळीने या कट्ट्याची मैफिल रंगली त्या सखी विद्या अटक यांनी त्यांच्या जखम आणि चिंब पाऊस बरसताना या कवितांचे सादरीकरण केले. त्याचबरोबर या कट्ट्याच्या पहिल्या आषाढ काव्यमैफिलीसाठी विशेष मुंबईवरून आलेल्या उर्मिला खानविलकर यांनी येणारे पावसा ऽऽऽ या त्यांच्या कवितेसह, एका ठिकाणी, एका घटनेनंतर सुकलेल्या झाडांकडे पाहून स्फुरलेली ‘निष्पर्ण’ कविता सादर केली. या कवितेने उपस्थितांच्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या. मात्र सुप्रिया ताम्हाणे यांच्या “सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का?” याचे विडंबन करून सादर केलेल्या कवितेने काव्यानंद कट्टा आनंदी झाला.

 असा असेल पुण्यातील भुयारी मेट्रो मार्ग | पहा पूर्ण आणि मराठी व्हिडीओ

कवी अनिल बोरोले यांच्यासह बाळकृष्ण नेहरकर यांनी खरंच मला अभिमान वाटतो आणि वरुणराजाला लिहिलेले कवितापर पत्र आणि त्याची आलेली प्रचीती सांगितल्यानंतर तर काव्यानंद कट्ट्याची रंगत न वाढेल तर नवल. यावेळी “जाणीव” या समाजप्रबोधन करणाऱ्या चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते विश्वास रांजणे यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या. शेवट अध्यक्ष मच्छिंद्र नरके यांनी त्यांची गाजलेली बाप आणि पावसावरील कवितेने झाला. यावेळी नरके यांनी त्यांना आलेले कवितांचे अनुभव सांगत, “जे न देखे रवि, ते देखे कवी” हे सत्य कसे आहे, हे सप्रमाण विषद केले.

 उजनी धरणातून सोडलेल्या पाण्याचा असा व्हिडीओ तुम्ही पाहिला नसेल

या पहिल्या आषाढ काव्यमैफिलीच्या “काव्यानंद कट्ट्यावर” शिवलिंग माळी, विनायक देशमुख, संजय कोरे, लायन कविता मोरे यांच्यासह काव्यरसिक उपस्थित होते. हॉटेल राजमुद्रा’चे संचालक नारायण शिंदे यांनी सर्वांचे स्वागत, कवी राजेंद्र वाघ यांनी सूत्रसंचालन तर कवयत्री रुपाली करडिले यांनी उपस्थितांचे आभार मानले.

 महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी’च काय, सर्वच राजकीय पक्षांवर परखड भाष्य करणारी कविता

माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्युबवर फॉलो करा...!

आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes

आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आमच्या इंस्टाग्राम’ची लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/

 


0 Comments: