Headlines
Loading...
कर्वेनगर मध्ये दोघांना जीवे मारण्याचा प्रयत्न; दोन हल्लेखोर गजाआड

कर्वेनगर मध्ये दोघांना जीवे मारण्याचा प्रयत्न; दोन हल्लेखोर गजाआड

 

पुणे, दि. 26 (चेकमेट टाईम्स): 'मी इथला भाई आहे' म्हणत दोघांनी हातावरचे पोट असलेल्या दोघांना लाथा बुक्क्यांनी जबरी मारहाण करत, दगड, लोखंडी रॉड’ने डोक्यात मारून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. याबाबत सुदैवाने पोलीस तातडीने घटनास्थळी पोचल्याने पुढील अनर्थ टळला. यातील दोन्ही संशयितांना ताब्यात घेण्यात आलेले असून, पोलीस उपनिरीक्षक जनार्दन होळकर पुढील तपास करत आहेत.

 विसर्जन मिरवणुकीतील अनर्थ टळला; कर्वेनगर मार्शलच्या बेरक्या नजरेने तलवार बाळगणारा गजाआड

याबाबत वारजे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार दि. २५ जुलै २०२१ सायंकाळी ५. ३० च्या सुमारास वडारवस्ती भागात राहणारे दोघेजण त्यांच्या ओळखीच्या असलेल्या कर्वेनगर उड्डाणपुलाखाली चौकात असलेल्या ओम साई टी स्टॉल येथे आले. मात्र यावेळी काहीही कारण नसताना त्यातील एकाने 'मी इथला भाई आहे' असे म्हणत चहाची टपरी चालवणाऱ्यासह त्यांच्या कामगाराला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी मुख्य आरोपीसह असलेल्या दुसऱ्याने देखील त्याची साथ देत, लाथा बुक्क्यांनी, रस्त्याच्या कडेला पडलेले दगड फ्कून मारत, डोक्यात लोखंडी रॉड मारून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

 अवैद्य दारू विक्री करणाऱ्या कर्वेनगर मधील हॉटेलवर वारजे पोलिसांचा छापा; हजारोंची दारू जप्त

दरम्यान याबाबत घटनास्थळापासून जवळच असलेल्या कर्वेनगर पोलीस चौकीत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला. दोघांवर देखील उपचार करून सोडून देण्यात आलेले असून, हल्लेखोर वैभव उर्फ पप्या उकरे (वय.२४) आणि सुरज पवार (वय.२० दोघेही राहणार – वडारवस्ती, कर्वेनगर, पुणे) दोघांनाही ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे. संजय उर्फ सुरज पुजारी (वय.३० रा.कर्वेनगर) यांनी फिर्याद दिली आहे.

 कर्वेनगर मध्ये सामोसे कारखान्यात सिलेंडरचा भडका उडून ४ जण जखमी; दोघांची प्रकृती चिंताजनक

सदरील दोन्ही संशयित हल्लेखोर रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्यांनी हा हल्ला कोणत्या कारणाने केला? त्यांचे आणखीन कोणी साथीदार आहेत का? याचा तपास वारजे पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक जनार्दन होळकर करत आहेत.

 वारजे, कर्वेनगर मध्ये वाहनांवर हल्ला करत काचा फोडल्या; २० वाहनांचे नुकसान

माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्युबवर फॉलो करा...!

आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes

आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आमच्या इंस्टाग्राम’ची लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/


0 Comments: