Headlines
Loading...
कर्वेनगर हिंगणे होम कॉलनीवर आतापर्यंत अन्यायाच झाला आहे; स्थानिक उमेदवाराला प्राधान्य मिळावे: दुधाणे

कर्वेनगर हिंगणे होम कॉलनीवर आतापर्यंत अन्यायाच झाला आहे; स्थानिक उमेदवाराला प्राधान्य मिळावे: दुधाणे


पुणे, दि. २८ (चेकमेट टाईम्स): आतापर्यंत पुणे महानगरपालिकेच्या अनेक निवडणुका झाल्या, मात्र त्यात हिंगणे होम कॉलनी भागाला लोकप्रतिनिधित्व देण्यात आले नाही. या भागावर एकप्रकारे अन्यायच झाला आहे. या भागाला लोकप्रतिनिधित्व द्यावे अशाप्रकारची मागणी वारजे कर्वेनगर भागातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माणिक दुधाणे यांनी केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष आणि कर्वेनगर भागातील राष्ट्रवादीचे स्थापनेपासूनचे कट्टर कार्यकर्ते आनंद उर्फ बंडू तांबे आणि त्यांचे सुपुत्र शुभम तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

 आनंद तांबे नगरसेवक व्हावेत ही तर नागरीकांचीच इच्छा; अनेकांच्या डोळ्यात तरळले अश्रू

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह तांबे पितापुत्राच्या वाढदिवसानिमित्त कर्वेनगर परिसरात वृक्षारोपण, कापूर तुळशीच्या रोपांचे वाटप, रांगोळी स्पर्धा त्याचबरोबर विशेषतः रिक्षांकरिता प्रवासी आणि चालकांमध्ये सुरक्षा पडदा, टायर, फुट मॅट, मीटर कव्हर अशा साहित्याचे वाटप करण्यात आलेच, शिवाय ज्या रिक्षांचे हूड फाटले आहे, त्या रिक्षांना पूर्ण हूड देखील मोफत वाटप केली गेली. त्याचबरोबर तांबे यांच्या संकल्पनेतून जुन्या पुस्तकांचे वाचनालय, जुन्या सायकल आणि मोबाईल दुरुस्त करून गरजवंत विद्यार्थ्यांना देण्याच्या उपक्रमाची राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, रवींद्र माळवदकर, प्रदीप देशमुख, प्रदीप उर्फ बाबा धुमाळ, स्वप्नील दुधाणे यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली. यावेळी हिंगणे होम कॉलनी परिसरातील नागरिक, रिक्षाचालकांनी तांबे यांच्या कार्याचा गौरव करताना तांबे यांच्या कारकीर्दीवर प्रकाश टाकलाय, पाहूयात नेमकं कोण कोण काय म्हणाले आहे...

 रिक्षाचालकांना सरकारने नाही मात्र यांनी केली कोरोना काळात मदत; पहा याचा भविष्यात काय होणार परिणाम

माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्युबवर फॉलो करा...!

आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes

आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आमच्या इंस्टाग्राम’ची लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/

 

दहीहंडी उत्सव रद्द केलेल्या या पुणेकर मंडळाने घालून दिलंय एक वेगळा आदर्श; नेमकं काय केलंय पहाच

0 Comments: