Headlines
Loading...
'पादाकुलक' या पद्मावर्तनी वृतामधील कविता सादर करण्याची अनोखी कल्पना वापरली या कविसंमेलनात

'पादाकुलक' या पद्मावर्तनी वृतामधील कविता सादर करण्याची अनोखी कल्पना वापरली या कविसंमेलनात

 पुणे, दि. २७ (चेकमेट टाईम्स): आम्ही विश्व लेखिका',पुणे विभागाचं 'पद्मावर्तनी' कविता संमेलन दि १८ जुलै २०२१ रोजी ऑनलाईन साजरं झालं. या संमेलनामध्ये 'पादाकुलक' या पद्मावर्तनी वृतामधील कविता सादर करण्याची अनोखी कल्पना 'आम्ही विश्व लेखिकापुणे विभागाच्या अध्यक्ष ज्योत्स्ना चांदगुडे यांची होती. 

 मासिक पाळी आणि पंढरपुरच्या वारीतील वारकरी महिला, मुलींबाबत भयानक वास्तव; चेकमेट टाईम्सचे विशेष वृत्त

या संमेलनाला 'आम्ही विश्व लेखिका'च्या उपाध्यक्ष विजया मारोतकर या अध्यक्ष म्हणून लाभल्या. 'आम्ही विश्व लेखिका',चा विश्वरथ जगभर जाण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी, जास्तीतजास्त भगिनी लिहित्या होण्यासाठी आणि त्यांना व्यासपीठ कसे मिळेल यासाठीची त्यांची तळमळ, अनेक कवितांच्या ओळींचे दाखले देताना त्यांच्या मनोगतामध्ये व्यक्त झाली. सहभागी कवयित्रींचे कौतुक केले आणि मार्गदर्शन केले.

 जाणून घ्या कोण आहेत महाराष्ट्रात सर्वाधिकवेळा निवडून आलेले टॉप १५ खासदार

“ती सध्या काय करते...?, ती ही झाली स्मार्ट आता, स्मार्टफोन हाताळतांना, खिडकीतूनच शोधलं आभाळ आता घरात राहताना” अशी स्वरचित सुरेख कविताही त्यांनी सादर केली. प्रमुख पाहुण्या म्हणून वृत्तबद्ध काव्यलेखनाच्या सखोल अभ्यासक वर्षा बेंडेगिरी-कुलकर्णी उपस्थित होत्या. वृत्तबद्ध कविता लिहिण्याचं गमक त्या त्या वृत्ताची लय पकडणे आहे, असं त्या म्हणाल्या. वृत्त शिकण्यासाठी असलेला समुहावरचा उत्साह त्यांना खूप भावला असल्याचे  त्यांनी मनोगतात सांगितलं. “ढिगाऱ्यातल्या स्मृतीतळाशी, अवचित काही आले हाती, तुकड्यामधले घड्याळ उरले, टिकटिक त्याची चालू होती” ही स्वरचित सुंदर कविता देखील त्यांनी सादर केली. 

 मुलाची झाली मुलगी, कसा होता तो प्रवास, कसे होते "ते अनुभव"; पहा तृतीयपंथी चांदणी गोरे यांची आपबिती

'आम्ही विश्व लेखिका', पुणे. विभागाच्या अध्यक्ष ज्योत्स्ना चांदगुडे यांनी प्रास्ताविक केले. १८ जुलै २०२१ रोजी पुणे विभाग सुरु होऊन एकच महिना झाला आणि इतक्या कमी अवधीमध्ये समूहाच्या झालेल्या प्रगतीचा आलेख मंडला. या संमेलनात कवयित्रींनी सहभागी करून घेताना समूहावर 'पादाकुलक' वृत्त शिकून नव्याने लिहिणाऱ्या कवयित्रींनी प्राधान्य दिलं गेलं असल्याचं त्यांनी सांगितलं. “ना उरते रे भान जगाचे, हवेहवेसे गंध फुलांचे, अधरामधुनी बहर सांडती, मादक मोहक त्या श्वासांचे” ही स्वरचित 'पादाकुलकवृत्तामधली अलवार कविता त्यांनी सादर केली.  

 सलग तीन वर्षे, तीन शिक्षकांनी लैंगिक अत्याचार केले; चांदणी गोरे यांच्या शालेय जीवनातील थरार

या सुरेख संमेलनाचे सूत्रसंचालन 'आम्ही विश्व लेखिका'च्या उपसचिव साधना कुलकर्णी तितक्याच सुंदर पद्धतीने केले. “आषाढाच्या पागोळ्यांनी, धूसर होई सारे अंगण, झाडे वेली ओघळणारे, अमृत ठिबके त्यातुन कण कण” ही कविता त्यांनी सादर केली.

 प्रणिती शिंदेंनी खासदाराला बेवडा म्हटले; खासदारांनी दिले त्याच शैलीत प्रतिउत्तर

या काव्यसंमेलनामध्ये एकूण १९ कवयित्रींच्या कविता सादर झाल्या. किमया ही कविता वीणा पुरोहित यांनी सादर केली. ऋतुरंग कविता ज्योत्सना तानवडे यांनी सादर केली. आज उडाला आकाशी या ही कविता विशाखा बेके यांनी सादर केली. 'ओढ' ही कविता साधना शेळके यांनी सादर केली. 'ये ना अवचित दारी' ही कविता प्रज्ञा मिरासदार यांनी सादर केली. 'सागर' नावाची कविता वैजयंती विंझे आपटे यांनी सादर केली. 'बकुळ' शीर्षकाची कविता वासंती वैद्य यांनी सादर केली. या व्यतिरिक्त संध्या वाघ, जयश्री कुलकर्णी, जयश्री श्रोत्रिय, संजीवनी या कवयित्रींनी आपल्या सुंदर अशा 'पादाकुलक' पद्मावर्तनी वृत्तामधल्या विविध विषयांवरील कविता सादर केल्या. 

 वारकऱ्यांसमोर तमाशा कलावंतीनिंची नृत्य सेवा | वारकऱ्यांनी देखील धरला ताल

या कार्यक्रमामध्ये आम्ही विश्व लेखिकांच्या उपाध्यक्ष मीना शिंदेकार्याध्यक्ष वैशाली मोहिते, सचिव माधुरी गयावळ, उपसचिव साधना कुलकर्णी, कोषाध्यक्ष एकता कारेगांवकर निमंत्रक संध्या वाघ या संचालक शीतलताई माडगूळकर, संचालक कल्पना कुलकर्णी अशा 'आम्ही विश्व लेखिका'च्या कार्यकारिणी सदस्य उपस्थित होत्या. कोषाध्यक्ष एकता कारेगांवकर यांनी आभार प्रदर्शन केले आणि या सुरेख कार्यक्रमाची सांगता झाली. 

 गणपती विसर्जन मिरवणुकीतील असे डान्स तुम्ही क्वचितच पाहिले असतील

माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्युबवर फॉलो करा...!

आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes

आमच्या युट्युब’ची लिंक :https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आमच्या इंस्टाग्राम’ची लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/

 


0 Comments: