Headlines
Loading...
नैसर्गिक आपत्तीत सामान्य नागरिकांची साथ देण्यास राष्ट्रवादी सक्षम आहे: प्रशांत जगताप

नैसर्गिक आपत्तीत सामान्य नागरिकांची साथ देण्यास राष्ट्रवादी सक्षम आहे: प्रशांत जगताप

 पुणे, दि. २७ (चेकमेट टाईम्स): अतिवृष्टी असो की भूकंप, कोरोना महामारी असो की यापूर्वी आलेली कोणतीही संकटे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी सामान्य नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आहे आणि भविष्यात देखील उभी राहील अशी भावना व्यक्त केली आहे राष्ट्रवादीचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विष्णुपंत सुखदेव सरगर यांच्या वतीने आयोजित गरजू नागरिकांना छत्र्यांचे वाटप कार्यक्रमात ते बोलत होते.

 अजितदादा या विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवा; कार्यकर्त्यांची अजित पवार यांना चिठ्ठी

वारजे कर्वेनगर परिसरातील राजहंस कॉलनी, आकाशनगर, वारजे जकात नाका परिसरात प्रशांत जगताप, विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, रविंद्र माळवदकर, बाबा धुमाळ, स्वप्निल दुधाणे यांच्या हस्ते छत्र्या वाटप करण्यात आल्या. यावेळी महेश हांडे, सुनिता सरगर, अशोक मोरे, अरुण करपे, अरविंद साळुंखे, दत्ता मोघे, केदार मारणे, किशोर शेडगे, राजाभाऊ सूर्यवंशी, विठ्ठल पासलकर, दीपक चांदगुडे, विनू अंग्रे, नितीन खैरनार, सुभाष मोरे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 राष्ट्रवादी नगरसेविकेचे पदाधिकाऱ्यांवर सनसनाटी आरोप

माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्युबवर फॉलो करा...!

आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes

आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आमच्या इंस्टाग्राम’ची लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/


0 Comments: