Type Here to Get Search Results !

वारजे मधील फणसाच्या झाडाचे त्यांनी केले असे काही, की पालिकेच्या उद्यान विभागाची मती झाली गुंग | Jackfruit Tree | Pune Corporation

He did something about the jackfruit tree in Warje, that the opinion of the garden department of the municipality was dumb

file photo of Jackfruit Tree


पुणे, दि. १ (चेकमेट टाईम्स): आपला स्वार्थ साधण्यासाठी मनुष्यप्राणी कधी, कुठे आणि काय करेल याचा नेम नाही. पुण्यातील वारजे माळवाडी (Warje Malwadi) भागामध्ये अशीच एक घटना घडली असून, चक्क फणसाच्या झाडाचा केसाने गळा कापण्याचे दुष्कृत्य केले आहे. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पुणे महानगरपालिकेच्या उद्यान विभागाचीच  (Pune Municipal Corporation Garden Department) मती गुंग झाली असून, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर झाडे लावण्याच्या (Tree Plantation Programme) कार्यक्रमांचे आयोजन केले जात असताना, झाड तोडल्याची (Jackfruit Tree Cutting) कारवाई करावी का नको या संभ्रमात उद्यान विभाग असल्याचे दिसते आहे.

वारजे माळवाडी मधील यशोदीप चौकातून (Yashodeep Chowk) पाण्याच्या टाकीकडे जाणाऱ्या रस्त्यावर संघर्ष चौकात असलेल्या गुरुदत्त अपार्टमेंट (Gurudatta Apartment) या नव्याने विकसित करण्यात आलेल्या इमारतीसमोर हे फणसाचे किमान २० वर्षे जुने असे मोठे झाड होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बांधकाम व्यावसायिकाने सामाजिक आणि नैसर्गिक बांधिलकी जपत झाडाला काहीही न करता इमारत बांधली. मात्र ज्या दुकानासमोर हे झाड होते, त्याला त्या बांधकाम व्यावसायिकाच्या सामाजिक आणि नैसर्गिक बांधिलकीपेक्षा स्वत:ची आर्थिक बांधिलकी अधिक महत्वाची वाटली आणि त्याने त्या सुमधुर रसाळ फळे देणाऱ्या महाकाय वृक्षाची दिवसाढवळ्या कत्तल केली.

Spot Photo


हे सगळे दिवसाढवळ्या होत असताना, काही निसर्गप्रेमींनी महानगरपालिकेच्या उद्यान विभागाला कळवले देखील. मात्र उद्यान विभागाकडून काहीही हालचाल होत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर नागरिकांनी “जनतेच्या मनातला निर्भय आवाज” म्हणून प्रसिद्ध असलेल्या “चेकमेट टाईम्स”ला छायाचित्रांसह माहिती पुरवली. त्यानंतर चेकमेट टाईम्सने (Checkmate Times) या गोष्टीचा मागोवा घेतला असता, उद्यान विभागाचे हार्टीकल्चर मिस्त्री विलास आटोळे (Horticulture Mistri PMC Garden) यांना याबाबत माहिती होती. मात्र सध्या उद्यान विभागाचे सुगीचे दिवस अर्थात वृक्षारोपण कार्यक्रम सुरु असल्याने त्याकडे लक्ष देता आले नसल्याचे दुर्दैवी वास्तव समोर आले आहे. मात्र त्यांनी वारजे माळवाडी मध्ये अशी कोणतीही झाड तोडण्याची अथवा छाटण्याची परवानगी दिली नसल्याची माहिती, चेकमेट टाईम्स’शी बोलताना दिली. त्याचबरोबर वृक्ष तोडणाऱ्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले आहे.

एकूणच निसर्गाने कोरोना सारख्या भयंकर महामारीच्या माध्यमातून माणसाला जागेवर आणले असे बोलले जात असताना, अशीही काही मनसे आहेत, जी स्वत:च्या फायद्याकरिता अजूनही निसर्गावर अत्याचार करताना जराही विचार करत नाहीत. अशा कृतघ्न व्यक्तींवर कठोर शासन केले जावे अशी मागणी निसर्गप्रेमींकडून होऊ लागली आहे.

 

याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर व्हाटस अॅप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्युबवर फॉलो करा...!

फेसबुक लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes

युट्युब लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes

इंस्टाग्राम लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.