Type Here to Get Search Results !

छत्रपती शिवरायांच्या संदर्भातील एका लिखाना बाबत राज ठाकरे यांनी पुण्यात घेतली यांची भेट

 

पुणे, दि. २० (चेकमेट टाईम्स): महाराष्ट्राचेच नव्हे तर पूर्ण देशाचे आणि जगातील लढवय्यांचे आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भातील एका लिखाणाबाबत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज मंगळवार दि.२० जुलै २०२१ महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज ठाकरे मनसैनिकांच्या बैठकांसाठी तीन दिवसीय पुणे दौऱ्यावर आहेत. दरम्यान त्यांनी आज वेळात वेळ काढून बाबासाहेबांची भेट घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

 ऑक्सिजन मिळवण्यासाठी राज ठाकरेंची मदत घ्या; चंद्रकांत पाटील यांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला

बाबासाहेब पुरंदरे आणि राज ठाकरे यांचे कौटुंबिक संबंध आहेत. ठाकरे यांना बाबासाहेब वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात. मात्र आजच्या त्यांच्या भेटीत कोणत्या विषयावर चर्चा झाल्या याचा तपशील भेटू शकला नाही. असे असले तरी एरवी कार्यकर्त्यांमध्ये मास्क शिवाय दिसणारे राज ठाकरे आज बाबासाहेबांच्या भेटीत मास्क लावून गेलेले छायाचित्रात दिसते आहे. बाबासाहेब पुरंदरे यांचे वाढलेले वय आणि त्यांच्या तब्बेतीची काळजी म्हणून, राज ठाकरे यांनी मास्क परिधान केल्याने त्यांच्या या कृतीबाबत कौतुक होते आहे.

 मनसेचे सगळे नगरसेवक चांगले काम करत होते आणि चांगलेच काम करत आहेत: राज ठाकरे

राज ठाकरे यांनी पुण्यात वसंत मोरे यांच्या रूपाने शहरअध्यक्ष नेमल्यानंतर शहर मनसे मध्ये एक नवचैतन्य आल्याचे दिसते आहे. शहरभरात वसंत मोरे लक्ष घालून आहेत आणि आमच्याशिवाय यंदाचा पुण्याचा महापौर होणार नाही, असा विश्वासही मोरे यांनी व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख म्हणून राज ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना ताकद देणे अपेक्षित असताना, राज ठाकरे पुण्याला देत असलेला वेळ पाहता, राज ठाकरे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पूर्ण लक्ष देण्याचा विचार केल्याचे स्पष्ट होते आहे. राज ठाकरे शहराला अधिकचा वेळ देऊ लागल्याने मनसे उसळी घेईल अशी शक्यता राजकीय अभ्यासक वर्तवू लागले आहेत.

 राज ठाकरे यांनी केले चक्क मोटारीचे उद्घाटन; कार्यकर्त्यांच्या आग्रहाला राज ठाकरे यांनी दिला मान

माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्युबवर फॉलो करा...!

आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes

आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आमच्या इंस्टाग्राम’ची लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/

 


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.