Type Here to Get Search Results !

वांजळेंच्या घरात भरदुपारी घरफोडी, सोने आणि रोख रकमेवर डल्ला; वारजे पोलिसात गुन्हा दाखल

 



file photo

पुणे, दि. २१ (चेकमेट टाईम्स): वांजळे नाव घेतली की अवघ्या महाराष्ट्राच्या डोळ्यासमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दिवंगत सोनेरी आमदार रमेश वांजळे यांचा चेहरा आणि त्यांच्या अंगावरील सोने सर्वांच्याच डोळ्यासमोर येते. त्याचं वांजळे यांचे गाव असलेल्या न्यू अहिरेगाव मधील, वांजळे परिवारातील एकाचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम आणि सोन्यावर डल्ला मारल्याची घटना समोर आली आहे. याबाबत वारजे पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, वारजे पोलीस तपास करत आहेत.

 वारजे वाहतूक पोलिसांच्या मनमानीमुळे पोलिसांसह नागरिकांचा देखील जीव गुदमरतोय

वारजे पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक शिवदास गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील फिर्यादी यांच्या न्यू अहिरेगाव मधील विशालगड कॉलनी येथील, योगीराज हाईटस मधील पहिल्या मजल्यावर असलेल्या वांजळे यांच्या घराचे कुलूप उचकटून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश मिळवत, बेडरूम मधील कपाटात ठेवलेली रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने चोरून नेले. आषाढी एकादशीच्या दिवशीच भरदुपारी १२ ते सायंकाळी ६.३० च्या दरम्यान फिर्यादी वांजळे यांच्या पत्नी तेथून जवळच असलेल्या त्यांच्या नातेवाईकांना भेटायला गेल्या होत्या, दरम्यानच्या काळात ही घटना घडली. वांजळे राहत असलेल्या या इमारतीला सीसीटीव्ही, सुरक्षारक्षक अशी कोणतीही सुरक्षा यंत्रणा नसल्याचे गायकवाड यांनी चेकमेट टाईम्स’शी बोलताना सांगितले.

 सिंहगड रोड, दत्तवाडी, वारजे पोलीस स्टेशन हद्दीत जुगार अड्ड्यांवर पोलिसांचे छापे; १४ जणांना अटक

याबाबत सोमनाथ वांजळे (वय.३४ रा.योगीराज हाईटस, न्यू अहिरेगाव, वारजे माळवाडी, पुणे) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात वारजे पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक शिवदास गायकवाड पुढील तपास करत आहेत.

 वारजे हायवेवर वारंवार येतंय पाणी; मनपाने नाले सफाई न केल्याने नागरिकांना त्रास

माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्युबवर फॉलो करा...!

आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes

आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आमच्या इंस्टाग्राम’ची लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/

 


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.