Type Here to Get Search Results !

सचिन दांगट यांच्या कामाबद्दल सांगेल तेवढं कमी आहे; आमदार भिमराव तापकीर यांची स्तुतिसुमने


 पुणे, दि. ११ (चेकमेट टाईम्स): गेले ९ वर्षे आपला वाढदिवस हा सामाजिक कामांचा संकल्पदिवस कसा होईल असा प्रयत्न करणाऱ्या स्वीकृत नगरसेवक सचिन विष्णुपंत दांगट यांच्या कामांचा पाढा वाचायचा म्हटला तर दिवस पुरणार नाही. सातत्याने न थकता, ना थांबता अखंड सेवाव्रत घेतलेला सचिन दांगट हा भाजपचा कार्यकर्ता आहे याचा आपल्याला अभिमान आहे, अशाप्रकारची स्तुतिसुमने खडकवासला विधानसभा मतदार संघाचे आमदार भिमराव तापकीर यांनी व्यक्त केली. सचिन दांगट यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित, कोरोना काळात आपला जीव धोक्यात घालून कार्यरत राहिलेल्या स्वच्छता कर्मचारी, डॉक्टर, पीएमपीएमएल कर्मचाऱ्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. स्वीकृत नगरसेवकाला महानगरपालिकेचा कोणत्याही प्रकारचा निधी नसताना सचिन दांगट यांनी स्व-खर्चातून नागरिकांची कामे करत, आपल्यावर पडलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे आणि भविष्यात अशाचप्रकारे ते लोकोपयोगी काम करत राहतील असा विश्वासही तापकीर यांनी व्यक्त केलाय. पाहूयात सचिन विष्णुपंत दांगट यांनी काय केलाय त्यांच्या वाढदिवसानिमित्त संकल्प, दांगट यांच्याबद्दल पालिका अधिकारी, डॉक्टर आणि पीएमपीएमएल कर्मचाऱ्यानी काय व्यक्त केल्यात भावना...

 

माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्युबवर फॉलो करा...!

फेसबुक लिंक : फेसबुक लिंक :

युट्युब लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes

इंस्टाग्राम लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.