Type Here to Get Search Results !

ठरलेल्या रकमेपेक्षा अर्ध्या रकमेने भरल्या गेलेल्या टेंडरमागे नेमके गणित काय? पडताळणी होणे गरजेचे



 पुणे, दि. १२ (चेकमेट टाईम्स): पुणे महानगरपालिकेच्या वतीने रेग्युलर मेंटनन्सच्या नावाने (रेमी) काही टेंडर ही वर्षभरासाठी काढली जातात. अनेकदा त्याची रक्कम लाखोंच्या, कोटींच्या घरात असते. मात्र ही टेंडर जवळपास अर्ध्या किंवा अर्ध्याहून कमी किमतीने विकली जात असल्याचा प्रकार समोर आला असून, टेंडरची ही कामे होत असतील का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. तर अशा कामांची सखोल पडताळणी केली गेली पाहिजे अशी भावना पुणेकरांकडून व्यक्त केली जात आहे.

 

मात्र ती कामे कोणती असतात याबाबत अनेकजण अनभिज्ञ असतात. अशाचतर ती कामे प्रभागांमध्ये राडारोडा उचलणे, पावसाळी आणि ड्रेनेज लाईन स्वच्छ करणे, पदपथ आणि चेंबरची झाकणे बदलणे, पदपथ दुरुस्ती करणे इत्यादी प्रकारची किरकोळ कामे असतात. मात्र ती होतात का? होत असतील तर अशाच प्रकारच्या इतर विकासकामांसाठी टेंडर लावली जातात त्याचे काय होते? जेवढ्या मोठ्या स्वरूपाची टेंडर असतात तेवढ्या रकमेची कामे करून, कमी रक्कम घ्यायला ठेकेदाराला परवडते कसे? असे एक ना अनेक प्रश्न समोर येतात.

 

कोणताही ठेकेदार हा पूर्ण व्यावसायिक असतो. कोणताही व्यावसायिक तोट्यात व्यवसाय करत नाही. त्याचबरोबर ठेकेदाराला मिळणाऱ्या बिलांमध्ये जावक देखील किती असते हे अनेकांना माहित आहे. मग जवळपास अर्ध्या रकमेने घेतलेली टेंडर ठेकेदाराला परवडतात कशी? बरं त्यातही ठराविक ठेकेदारालाच ही कामे मिळवण्यात कसे यश येते? वर्षानुवर्षे तेच ते ठेकेदार अचूक टेंडर कशी भरतात? असे प्रश्न समोर येत असून, याचा लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, माहिती अधिकार कार्यकर्ते आणि नागरिकांनी सखोल अभ्यास करणे गरजेचे वाटते आहे.

 

ही कामे प्रत्यक्षात होतात की कागदावर होतात याचा ताळमेळ बांधणे देखील तितकेच गरजेचे असून, पुणेकरांच्या कररूपी पैशांचा विनियोग योग्य रीतीने होतोय का? याचा ताळेबंद पाहण्याची वेळ आली आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

 

याबाबत आम्ही वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाचे महापालिका सहायक आयुक्त उमाकांत डिग्गीकर यांना विचारणा केली असता, त्यांनी ठेकेदाराला परवडत असेल म्हणूनच ठेकेदार त्या रकमांचे टेंडर भरत असतील. निविदांच्या स्पर्धा होतात आणि त्यात पालिकेचे पैसे वाचतात असेही डिग्गीकर म्हणाले. मात्र त्याचवेळी पालिकेने काढलेला दर जास्त असू शकतो असेही संकेत डिग्गीकर यांनी दिलेत. मग अशावेळी अर्धा टक्का, एक टक्का कमी रकमेने दिली गेलेलेई टेंडर कोणाच्या फायद्यासाठी आणि कशी दिली जातात असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय.

 

माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्युबवर फॉलो करा...!

 

आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes

आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आमच्या इंस्टाग्राम’ची लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.