Type Here to Get Search Results !

आज संध्याकाळी शिवणे ते कोंढवे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होणार?

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news

 


There will be a lot of Traffic Jam on Shivane to Kondhawe Dhawade road this evening


 

There will be a lot of Traffic Jam on Shivane to Kondhawe Dhawade road this evening

 

पुणे, दि. 23 एप्रिल 2024 (चेकमेट टाईम्स): बारामती लोकसभा (Baramati Loksabha) मतदारसंघाच्या उमेदवार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या प्रचारानिमित्त आज मंगळवार दि. 23 एप्रिल 2024 पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) शिवणे उत्तमनगर (Shivane Uttam Nagar) भागात बैठका आणि कोपरा सभा घेणार आहेत. त्यातच आज कोंढवे धावडे (Kondhave Dhawade) मध्ये बगाड आहे. त्याला मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे. हनुमान जयंती (Hanuman Jayanti) निमित्त अनेक ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन आहे. त्यामुळे या रस्त्यावर आज सायंकाळपासून नागरिकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला (Traffic Jam) सामोरे जावू लागू शकते. त्याचा फटका अजित पवार यांच्या ताफ्याला (Ajit Pawar Convoy) देखील बसू शकतो.


 

 

वारजे माळवाडीचा (Warje Malwadi) पालिकेत प्रवेश झाल्यापासून आतापर्यंत रस्त्याचे रुंदीकरण न झाल्याने हायवे चौक ते गणपती माथा या टप्प्यात तर वाहतूक कोंडी नित्याचीच आहे. मात्र आता शिवणे उत्तमनगर मध्ये वाढलेल्या नागरीकरणामुळे शिवण्यातील शिंदे पूल ते कोंढवे धावडे दूरसंचार कार्यालयापर्यंत वाहतुकीची कोंडी नित्याची झाली आहे. त्यात आज सायंकाळी उपमुख्यमंत्र्यांचा दौरा असल्यामुळे, त्यांच्या दौऱ्यादरम्यान रस्त्यावरील सामान्य मतदारांच्या (Common Voters) नेहमीच्या वाहनांची वाहतूक थांबवून, मान्यवरांच्या ताफ्याला मार्ग करून दिला जाईल. यापूर्वी बुधवार दि.27 मार्च 2024 ला शिवणे भागात सकाळी सकाळी आलेल्या अजित पवारांना वाहतूक कोंडीचा फटका बसला होता. याबाबतचे चेकमेट टाईम्सने ते वृत्त प्रसारित केले होते. (ती बातमी वाचण्यासाठी याच शब्दांवर क्लिक करा.) त्यांचा ताफा नवभारत हायस्कूल (Navbharat High School) चौक आणि वारजे हायवे चौकाच्या वाहतूक कोंडीत अडकला होता. तशीच परिस्थिती आजही पुन्हा एकदा पाहायला मिळू शकते. त्यामुळे सामान्य मतदारांना उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याचा त्रास अधिक होईल यात शंका नाही.


 

 

सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांनाही प्रचारात येथील वाहतूक कोंडीचा फटका

सोमवार दि.1 एप्रिल 2024 वारजे माळवाडी मध्ये प्रचारासाठी आलेल्या सुनेत्रा पवार यांना वाहतूक कोंडीमुळे चालत मार्गक्रमण करावे लागले होते. मात्र चालायला देखील जागा नसल्याने एका दुकानाच्या ओट्यावर थांबण्याची त्यांच्यावर वेळ आली होती. याबाबतचे चेकमेट टाईम्सने ते वृत्त प्रसारित केले होते. (ती बातमी वाचण्यासाठी याच शब्दांवर क्लिक करा.) यानंतर रविवार दि.14 एप्रिल 2024 ला वारजे नाक्यावरील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात (Dr. Babasaheb Ambedkar Chowk) आलेल्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना इंगळे नगर (Ingale Nagar) मधील एका ठेकेदाराच्या घरी भेटीला जात असताना, वाहतूक कोंडीत अडकून पडण्याची वेळ आली होती. त्यांना तेथे चालत देखील मार्गक्रमण करणे शक्य नसल्याने, त्यानाही थांबून राहण्याची वेळ आली होती.

 


 

तुम्हीच पालकमंत्री आणि तुमच्याच विचारांचे लोकप्रतिनिधी तरीही हि अवस्था

2004 साली अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री (Guardian Minister of Pune) झाले ते सलग 10 वर्ष अर्थात 2014 पर्यंत राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार होते, तोपर्यंत पुण्याचे पालकमंत्री होते. त्यानंतर पुन्हा 2019 ला आलेल्या महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi) मध्ये देखील अजित पवार पालकमंत्री होते. तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे सरकार स्थापन झाल्यावर काही दिवस वगळता अजित पवारच पुण्याचे पालकमंत्री आहेत. तर 2017 ते 2022 वगळता पुणे महानगरपालिकेत अजित पवारांच्या विचाराच्याच पक्षांची सत्ता होती. या वारजे भागात पालिकेच्या स्थापनेपासून त्यांच्याच विचारांचे नगरसेवक आहेत. आमदार वगळले तर, शिवणे ते कोंढवे धावडे या भागातील ग्रामपंचायती, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य आणि खासदार देखील त्यांच्याच विचारांच्या होत्या. एवढे सगळे असताना देखील या भागातील रस्ते नागरीकरणाच्या प्रमाणात रुंद का झाले नाहीत? पुणे महानगरपालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्स (PMC Pune Property Tax) मध्ये सवलत मागण्यासाठी शिवणे मध्ये मोर्चा निघतो, कर्वेनगर मधला दुसरा उड्डाणपूल (Karvenagar Fly Over) रद्द झाल्याचे आंदोलन होते, त्यात खासदार सुप्रिया सुळे सहभागी होतात. मात्र त्यापेक्षा गंभीर मुद्दा असलेल्या वारजे ते उत्तमनगर पट्ट्यातील रोजच्या वाहतूक कोंडीवर कोणीच का मोर्चा काढला नाही? आंदोलन केले नाही? (Protest for Road Winding) असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातोय.


 

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा

 

https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.