Type Here to Get Search Results !

तेव्हा पवार खडकवासल्याच्या प्रचारात एवढे का उतरले नाहीत; मतदारांना पडलाय प्रश्न

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news


 


Then why did Pawar not get involved in Khadakwasla's campaign; Voters have a question


 

Then why did Pawar not get involved in Khadakwasla's campaign; Voters have a question

 

पुणे, दि. 29 एप्रिल 2024 (चेकमेट टाईम्स): बहुमताची नाही भीडभाड, सत्य तेच सांगू निर्भिड, संत तुकाराम महाराज (Sant Tukaram Maharaj) आणि महात्मा फुले (Mahatma Jyotiba Phule) यांच्या विचार आणि कार्याचा गाभा सत्याचा आग्रह राहिला आहे. सत्य सांगताना प्रसंगी बहुमताची भीडभाड बाळगणार नाही, असे तुकोबा म्हणतात. तर जोतिबा सत्य सर्वांचे आदी घर असल्याचे सांगतात. आज याच विचारांची आणि कृतीची खरी गरज आहे, म्हणून हे कटू सत्य मी धनराज मनोहर माने (Dhanraj Mane) आपणासमोर मांडत आहे. हे सत्य अनेकांना आता पचनी पडणार नाही. पण स्वत:वर वेळ आल्यावर माणूस स्वार्थी होतो (A man becomes selfish when he has time for himself) हेच यातून स्पष्ट होतंय आणि समोर येतंय तेव्हाच नसता का खडकवासला (Khadakwasla Vidhansabha) जिंकला... अशाच काही भावना राष्ट्रवादी विचारांचे मतदार (Voters of Nationalist Views) चेकमेट टाईम्स’कडे (Checkmate Times) व्यक्त करत आहेत.

 

 

झालंय असं की, गेल्या काही दिवसांपासून आपण लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha Election) प्रचाराची रणधुमाळी अनुभवतोय. मात्र यावेळी बारामती लोकसभा (Baramati Loksaba) मतदार संघाच्या प्रचाराकडे अर्थात निवडणुकीकडे पूर्ण देशाचे म्हटले तरी वावगे ठरणार नाही, लक्ष्य लागले आहे. मात्र याच बारामती लोकसभा मतदार संघात सध्या राष्ट्रवादीच्या दोन्ही पवार (Pawar vs Pawar) कुटुंबियांचे टार्गेट खडकवासला विधानसभा मतदार संघ असल्याचे दिसते. तिथे दस्तुरखुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) दिवसाला चार चार सोसायटी सभा (Society Meetings), कोपरा सभा (Corner Meetings) घेत आहेत. अनेकांना वैयक्तिक फोन करत आहेत, घरी जाऊन गाठीभेटी घेत आहेत. सुनेत्रा पवार (Sunetra Pawar), रुपाली चाकणकर (Rupali Chakankar), पार्थ पवार (Parth Pawar) आणि नेते जोमाने प्रचार करत आहेत. त्याचवेळी सुप्रिया सुळे (Supriya Sule), रोहित पवार (Rohit Pawar) यांनी देखील खडकवासल्यात प्रचाराची राळ उठवली आहे. अगोदर प्रचाराचा एक राउंड झालेला असताना देखील सुळे आणि रोहित पवारांकडून पदयात्रा, नागरिकांच्या गाठीभेटी सुरु आहेत. दर दिवसाआड याच विधानसभा मतदार संघात दोन्ही बाजूंचे मोठे नेते प्रचार करताना दिसत आहेत. मात्र त्यांच्या या निवडणुकीच्या कृतीत आणि तेव्हाच्या निवडणुकांच्या कृतीत काय फरक आहे, हे देखील मतदारांसमोर यायला हवे म्हणून हा लेखन प्रपंच...

 

 

खडकवासला विधानसभा मतदार संघाची निर्मिती झाल्यानंतर झालेल्या 2009 च्या पहिल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे विकास पंढरीनाथ दांगट (Vikas Nana Dangat), मनसेचे रमेश हिरामण वांजळे (Goldman Ramesh Wanjale) आणि भाजपाचे मुरलीधर किसन मोहोळ (Muralidhar Mohol) यांच्यात लढत होऊन मुळचे कॉंग्रेसचे असलेले रमेश वांजळे मनसेच्या उमेदवारीवर 22 हजार 518 मतांनी विजयी झाले होते. तेव्हा राज ठाकरे (Raj Thackeray) यांची मोठी लाट शहरभरात होती. काशी यात्रा (Kashi Yatra) सारख्या यात्रा काढून मतदार संघात वांजळे यांनी मोठे वातावरण तयार केले होते. त्यावेळी रमेश वांजळे यांनी राष्ट्रवादीकडे उमेदवारी मागितली होती, ती दिली गेली नाही. त्यांच्या विरुद्ध लढत देताना राष्ट्रवादीकडून शरद पवार यांची वारजे मध्ये सभा  (Sharad Pawar Sabha) आणि धनकवडी मध्ये अजित पवारांची बाईक रॅली (Ajit Pawar Bike Rally) झाली होती. मात्र तेव्हा मतदारांच्या सोयीच्या वेळा नसल्याच्या चर्चा मतदार संघात आहेत. पण आता ज्या ताकतीने बारामती लोकसभेसाठी प्रचार केला जातोय, त्याच ताकतीने तेव्हा प्रचार केला गेला असता तर तेव्हाच नसता का राष्ट्रवादीने खडकवासला जिंकला... अशाच काही भावना राष्ट्रवादी विचारांचे मतदार चेकमेट टाईम्स’कडे व्यक्त करत आहेत.

 

 

त्यानंतर रमेश वांजळे यांच्या अकाली निधनाने 2011 ला झालेल्या पोटनिवडणुकित (Khadakwasla By Election) विकास दांगट यांना पुन्हा तिकीट देणे अपेक्षित होते. दोन वर्षांपूर्वी ते मतदारांपर्यंत पोचले होते, चिन्ह पोचले होते, मात्र तसे झाले नाही. हर्षदा वांजळे (Harshada Ramesh Wanjale) यांना सहानुभूती मिळेल या अंदाजावर त्यांना आयात करत विकास दांगट यांना डावलून राष्ट्रवादीची उमेदवारी दिली. यावेळी हि निवडणूक प्रतिष्ठेची करत राष्ट्रवादीने तब्बल 27 आमदार, त्यातले 17 कॅबिनेट आणि राज्यमंत्री खडकवासल्याच्या प्रचारात उतरवले होते. मात्र केवळ हर्षदा वांजळे यांनी पक्ष बदलल्याने नाराज झालेल्या मतदारांनी भाजपाच्या पारड्यात मते टाकली आणि भिमराव तापकीर (Bhimrao Tapkir) यांना लॉटरी लागली. यावेळी हर्षदा वांजळे यांनी अपक्ष निवडणूक लढवावी आणि राष्ट्रवादीने बाहेरून पाठींबा द्यावा असे मत काहींनी मांडले होते. मात्र तसे झाले नाही. त्यामुळे राष्ट्रवादीने जर पुन्हा विकास दांगट यांना उमेदवारी दिली असती आणि त्याच ताकतीने तेव्हा प्रचार केला असता तर तेव्हाच नसता का राष्ट्रवादीने खडकवासला जिंकला... अशाच काही भावना राष्ट्रवादी विचारांचे मतदार चेकमेट टाईम्स’कडे व्यक्त करत आहेत.

 

 

दोनदा खडकवासल्यात पराभव चाखल्यानंतर आता तिसऱ्यांदा तरी राष्ट्रवादी काही धोरणे आखेल असे वाटत होते. 2014 ला राष्ट्रवादीने तिसऱ्यांदा खडकवासल्याच्या जागेसाठी होत असलेल्या निवडणुकीत दिलीप प्रभाकर बराटे (Dilip Barate) यांना उमेदवारी दिली. मात्र तिसऱ्यांदा देखील जुन्या चुका सुधारण्यात राष्ट्रवादीला अपयश आले. त्यांनी मोदींची मोठी लाट असून देखील, पुन्हा उमेदवाराला वाऱ्यावर सोडले. अगदी प्रचार संपण्याच्या शेवटच्या दिवशी अजित पवारांची धनकवडी मध्ये भर दुपारच्या कडक उन्हात काढण्यात आलेली दुचाकी रॅली वगळता पूर्ण प्रचाराच्या काळात राष्ट्रवादीच्या एकाही वरिष्ठ नेत्याने खडकवासल्यात प्रचार केला नाही. तेव्हा जर ज्या ताकतीने खडकवासल्यात आज प्रचार केला जातोय, त्या ताकतीने तेव्हा प्रचार केला गेला असता तर तेव्हाच नसता का राष्ट्रवादीने खडकवासला जिंकला... अशाच काही भावना राष्ट्रवादी विचारांचे मतदार चेकमेट टाईम्स’कडे व्यक्त करत आहेत.

 

 

एकूणच खडकवासल्यात तीनदा तीनदा राष्ट्रवादीला झटका बसल्यानंतर चौथ्यांदा तरी राष्ट्रवादी प्रचाराच्या रणनीती मध्ये सुधारणा करेल असे वाटत होते. 2019 च्या खडकवासला विधानसभेसाठी राष्ट्रवादीने सचिन शिवाजीराव दोडके (Sachin Dodke) यांना उमेदवारी दिली. यावेळी देखील राष्ट्रवादीने चूक काही सुधारली नाही. यावेळी देखील अमोल कोल्हे यांची धनकवडी मध्ये भल्या सकाळी झालेली दुचाकी रॅली (Amol Kolhe Bike Rally) वगळता पूर्ण प्रचाराच्या काळात राष्ट्रवादीच्या एकाही वरिष्ठ नेत्याने खडकवासल्यात प्रचार केला नाही. तेव्हाही मोदींची लाट होतीच. मात्र सचिन दोडके यांनी वारजे परिसरात केलेला विकास, त्यांची विकासाची दृष्टी, नागरिकांशी असलेला संपर्क पाहून मतदारांनी त्यांच्या पारड्यात भरभरून मतदान टाकले. यात त्यांचा जेमतेम 2 हजार 595 मतांनी निसटता पराभव झाला होता. त्यामुळे ज्या ताकतीने खडकवासल्यात आज प्रचार केला जातोय, त्या ताकतीने तेव्हा प्रचार केला गेला असता तर तेव्हाच नसता का राष्ट्रवादीने खडकवासला जिंकला... अशाच काही भावना राष्ट्रवादी विचारांचे मतदार चेकमेट टाईम्स’कडे व्यक्त करत आहेत.

 

 

या बाबींव्यतिरिक्त राष्ट्रवादीच्या चारही उमेदवारांच्या उमेदवारीला पक्षाच्याच इतर घटकांचा विरोध होता. तो त्या त्या वेळी कोणाचा होता, काय होता, त्यांनी निवडणुकीत काय भूमिका घेतल्या हे चेकमेट टाईम्स’लाच काय पक्षाच्या वरिष्ठांना आणि सामान्य मतदारांना देखील माहित आहे. पण तो मुद्दा सोडला तर आता ज्या पद्धतीने राष्ट्रवादीचे दोन परस्पर विरोधी गट एकमेकांच्या विरोधात काम करत आहेत. ते पाहून राष्ट्रवादी विचारांचे मतदार हे मात्र नक्की म्हणतायत की... ज्या ताकतीने खडकवासल्यात आज प्रचार केला जातोय, त्या ताकतीने तेव्हा प्रचार केला गेला असता तर तेव्हाच नसता का राष्ट्रवादीने खडकवासला जिंकला... तेव्हाच नाही का महाराष्ट्र पादाक्रांत केला असता. याबाबत आपल्याला काय वाटते? हे देखील महत्वाचे आहे. मात्र मनात वाटते ते कॉमेंट करणे तितकेच आव्हानाचे आहे. त्यामुळे बिनधास्त असणाऱ्यांच्या कॉमेंट्सचे चेकमेट टाईम्सच्या या आणि इतर लेखांसह, व्हिडीओ’वर देखील नक्कीच स्वागत आहे. पण जे कॉमेंट करणार नाहीत, ते चेकमेट टाईम्सच्या या लेखामधील मुद्द्यांवर चर्चा तरी नक्की करणार यात शंका नाही.

 

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा

 

https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share

 

 

https://www.youtube.com/watch?v=TO9CND6pXoY

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.