Type Here to Get Search Results !

वारजे रामनगर गोळीबार प्रकरणातील संशयित पिंपरी पोलिसांकडून ताब्यात

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news, loksabha election, election campaign, pune loksabha, baramati loksabha, shirur loksabha, maval loksabha, election news, political news, business news, Marathi news today

 

Suspects in Warje Ramnagar firing case detained by Pimpri police

 

Suspects in Warje Ramnagar firing case detained by Pimpri police

पुणे, दि. 9 मे 2024 (चेकमेट टाईम्स): बारामती लोकसभेचे मतदान (Baramati Loksabha Voting) पार पडल्यानंतर वारजे रामनगर मध्ये झालेल्या गोळीबार (Warje Ramnagar Firing) प्रकरणातील मुख्य संशयिताला ताब्यात घेण्यात पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 2 (Accused Arrested by Pimpari Chinchwad Police Crime unit 2) च्या पथकाला यश आले आहे. त्यापूर्वी वारजे पोलिसांच्या (Warje Police Station) तपास पथकाने या गुन्ह्यातील दोन अल्पवयीनांना (Juvenile) ताब्यात घेतले असल्याची माहिती समोर आली आहे.

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 2 चे पोलिस अंमलदार लोकसभा निवडणुक 2024 च्या अनुषंगाने पिंपरी भागात पेट्रोलिंग (Police Patroling) करुन रेकॉर्डवरील गुन्हेगारांची (Offenders on Record) तपासणी करत होते. यावेळी पोलीस अंमलदार सागर अवसरे (Sagar Awasare) व अजित सानप (Ajit Sanap) यांना त्यांचे गोपनिय बातमीदाराकरवी बातमी मिळाली कि, पिंपरी मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील (Dr. Babasaheb Ambedkar Chowk) सिटी प्राईड हॉटेल (City Pride Hotel) येथे एक इसम कमरेला पिस्टल (Pistol) सारखे हत्यार लावुन संशयितरित्या फिरत आहे. सदरील बाबत खात्रीशीर बातमी मिळालेवरुन गुन्हे शाखा युनिट 2 चे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम (PI Jitendra Kadam) यांनी पोलीस उपनिरीक्षक गणेश माने (PSI Ganesh Mane) व स्टाफला सुचना मार्गदर्शन करुन सापळा लावुन कारवाईचे आदेश दिले.

 

 

त्यानुसार पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे (Cp Vinay Kumar Choubey), अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी (IPS Vasant Pardeshi), पोलीस उपआयुक्त (गुन्हे) संदिप डोईफोडे (IPS Sandeep Doiphode), सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) विशाल हिरे (ACP Vishal Hire) यांचे मार्गदर्शनाखाली, गुन्हे शाखा युनिट 2 चे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, पोलीस उपनिरीक्षक गणेश माने, सहायक पोलिस फौजदार शिवानंद स्वामी (Shivanand Swami), दिलीप चौधरी (dili Choudhari), संतोष इंगळे (Santosh Ingale), सागर अवसरे, नामदेव कापसे (Namdeo Kapse), आतिष कुडके (Atish Kudake), देवा राऊत
(Deva Raut),
अजित सानप, शिवाजी मुंढे (Shivaji Mundhe) यांच्या पोलीस पथकाने बातमीप्रमाणे हॉटेल सिटी प्राईड परीसरात सापळा लावुन शोध घेत असतांना, संशयित इसम हा सिटी प्राईड हॉटेलचे ठिकाणी थांबला असलेला दिसुन आला. त्याचवेळी त्याला पोलीस आल्याची चाहूल लागल्याने, त्याने कमरेचे पिस्टल काढुन फायरिंग करण्याचे व उडी मारुन पळून जाण्याच्या तयारीत असतांना, पोलीस अंमलदार अजित सानप व नामदेव कापसे यांनी त्यास झडप घालुन अत्यंत धाडसाने व शिताफीने पकडले.

 

 

यावेळी त्याचे कमरेला लावलेले पिस्टल व जिवंत राउंड आढळून आले. सदर इसमाचे नाव सिध्दाप्पा मलिकार्जुन यळसंगीकर (Siddappa Mallikarjun Yalasangikar) (वय 35 रा. यळसंगी, ता. आळंद, जि. गुलबर्गा, राज्य कर्नाटक, सध्या राहणार सदगुरु हॉटेल, कोथरुड डेपो, पुणे) असे असल्याचे समोर आले. त्याचेकडे मिळुन आलेल्या पिस्टलबाबत केलेल्या सखोल तपासामध्ये मंगळवार दि. 7 मे 2024 रोजी प्रणव सुपर मार्केट समोर, रामनगर वारजे, पुणे येथे लोकांमध्ये दहशत निर्माण करणेसाठी तिघांनी पिस्टलमधुन दोन राउंड हवेत गोळीबार केले. “आम्ही इथले भाई आहोत”, असे म्हणत लोकांना शिवीगाळ करुन परिसरात दहशत निर्माण केली. त्यानंतर ते सर्व तेथुन पळून गेले असल्याची माहिती समोर आली. गोळीबार करणारा सिध्दाप्पा यळसंगीकर याच्यावर सिंदगी पोलीस स्टेशन (Sindagi Police Station) येथे दोन खुनाचे गुन्हे नोंद आहेत. सध्या तो जामीनावर सुटला असुन, पुणे येथे कामासाठी आला आहे. सिध्दाप्पा यळसंगीकर याने त्याचे साथीदारांसमवेत दहशत निर्माण करणेसाठी गोळीबार केल्याची कबुली दिली आहे. गोळीबार करुन सिध्दाप्पा यळसंगीकर हा पिंपरी परिसरातुन येवून लपुन बसला होता. गुन्हे शाखा युनिट 2 चे पोलीस अंमलदार अजित आण्णा सानप यांनी सरकार तर्फे दिले फिर्यादीवरुन पिंपरी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सिध्दाप्पा यळसंगीकर याने पिस्टल व जिवंत राउंड कोठून आणले व कोणाच्या सांगणेवरुन फायरींग केले याबाबत अधिक सखोल तपास सुरु आहे.

 

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा

 

https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share

 

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.