Type Here to Get Search Results !

उत्तमनगर पोलिस स्टेशन हद्दीत आढळला बॉम्ब; एनडीए’ची हद्द शेजारी असल्याने नागरिकांमध्ये चर्चांना उधाण

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news, loksabha election, election campaign, pune loksabha, baramati loksabha, shirur loksabha, maval loksabha, election news, political news, business news, Marathi news today

 

Bomb Found in Uttamnagar Police Station Area; As NDA's Territory is Neighboring, it is a source of discussion among the citizens

 

Bomb Found in Uttamnagar Police Station Area; As NDA's Territory is Neighboring, it is a source of discussion among the citizens

 

पुणे, दि. 10 मे 2024 (चेकमेट टाईम्स): बारामती लोकसभेचे मतदान (Baramati Loksabha Voting) पार पडल्यानंतर वारजे रामनगर मध्ये झालेला गोळीबार (Warje Ramnagar Firing). त्याच्या दुसऱ्या दिवशी झालेला कोयता हल्ला (Koyta Attack) या घटना ताज्या असतानाच, शेजारी असलेल्या उत्तमनगर पोलिस स्टेशन (Uttam Nagar Police Station) हद्दीत बॉम्ब (Hand Grenade) आढळून आल्याने या भागात चर्चांना उधाण आले आहे. उत्तमनगर पोलिसांनी या ठिकाणी धाव घेत, बीडीडीएस (BDDS) पथकाच्या सहाय्याने सदरील बॉम्ब ताब्यात घेऊन, एनडीए’च्या जंगलात नष्ट केला.

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तमनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एनडीए रस्त्यावरील कमळजाई मंदिर (Kamaljai Temple) आहे. या मंदिराजवळच एका ओढ्यावरील पुलाचे बांधकाम (Bridge Construction Work) सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) माध्यमातून करण्यात येत आहे. या पुलाच्या खोदकामादरम्यान गुरुवार दि. 9 मे 2024 दुपारच्या सुमारास मजुरांना चित्रपटात पाहिल्याप्रमाणे बॉम्ब सदृश वस्तू आढळून आली. यावेळी कामगारांनी भयभीत होऊन, याबाबत ठेकेदाराला कळवले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून ठेकेदाराने तत्काळ पोलिस यंत्रणेशी संपर्क करून, पोलिसांना पाचारण केले. उत्तमनगर पोलिसांना याबाबत माहिती मिळताच, उत्तमनगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक युसुफ शेख (PI Yusuf Shaikh), पोलीस निरीक्षक (गुन्हे) जितेंद्र कदम (PI Jitendra Kadam), पोलीस उपनिरीक्षक शितल अनुसे (PSI Shital Anuse), पोलीस अंमलदार तुषार केंद्रे (Tushar Kendre), धनंजय बिठले (Dhananjay Bithale), अशोक बनसोडे (Ashok Bansode), पंढरीनाथ कोळेकर (Pandharinath Kolekar) यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

 

 

यावेळी दखल झालेल्या उत्तमनगर पोलिसांच्या पथकाने सदरील वस्तू बॉम्बचा असल्याचे निदान करून, तत्काळ बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाला (bomb detection and disposal squads) पाचारण करत, सदर सदर बॉम्ब हस्तगत केला. हा बॉम्ब जिवंत (Live Bomb) मात्र अतिशय कमी शक्तीचा आणि जुना असल्याने क्षीण झालेला असल्याचा निष्कर्ष बीडीडीएस पथकाने काढला. तर वरिष्ठांच्या आदेशावरून निर्मनुष्य भाग असलेल्या एनडीए’च्या जंगलात (NDA Forest) सदरील बॉम्ब नेऊन त्याचा सुधारित स्फोटक उपकरणांच्या (IED - Improvised Explosive Devices) सहाय्याने त्याचा स्फोट करण्यात आला. मात्र यामुळे हा बॉम्ब कुठून आला? कधी आला? कोणी आणला? असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. मात्र शेजारीच एनडीए’ची (NDA) हद्द आहे आणि त्यांच्या सरावादरम्यान कधी खूप वर्षांपूर्वी हा बॉम्ब तिथे पडलेला असू शकतो, असा निष्कर्ष काढला गेला आहे. पूर्वी या ठिकाणी एनडीए’ची (National Defence Academy) सीमाभिंत नव्हती, त्यामुळे या भागात जवानांची रेलचेल होती. आताही शस्त्रधारी जवान येथील कमळजाई मंदिराजवळ रस्त्याच्या दोन्ही बाजूला रात्रंदिवस तैनात असतात. एकूणच बॉम्ब निकामी झाल्याने पोलिसांसह सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

 

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा

 

https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share

 

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.