Type Here to Get Search Results !

वारजे रामनगर मध्ये गोळीबाराची घटना ताजी असताना दुसऱ्या रात्री एकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news, loksabha election, election campaign, pune loksabha, baramati loksabha, shirur loksabha, maval loksabha, election news, political news, business news, Marathi news today

 

Koyta attacked a person the other night while the firing incident was fresh in Warje Ramnagar

Koyta attacked a person the other night while the firing incident was fresh in Warje Ramnagar

 

पुणे, दि. 9 मे 2024 (चेकमेट टाईम्स): वारजे रामनगर (Warje Ramnagar) मध्ये बारामती लोकसभा निवडणुकांची मतदान (Baramati Loksabha Voting) प्रक्रिया पार पडल्यानंतर झालेले गोळीबाराचे (Firing in Warje Ramnagar) प्रकरण ताजे असतानाच, आता त्याच्या दुसऱ्याच दिवशी आणखीन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रामनगर भागात एकावर कोयत्याने वार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to Murder) झाला. सुदैवाने तो वाचला असून, त्याच्यावर उपचार सुरु आहेत. याबाबत वारजे पोलिस स्टेशन (Warje Police Station) मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

याबाबत वारजे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवार दि.8 मे 2024 रात्री दहा वाजण्याच्या सुमारास वारजे रामनगर मध्ये राहत असलेल्या दोघा मित्रांमध्ये पैशांवरून वाद झाले. या वादाचे पर्यवसन मारामारी (Fight) मध्ये झाले. यावेळी धनंजय बबन बोराणे (Dhananjay Baban Borane) (वय.38. रा. रामनगर, वारजे, पुणे) याने आपल्याकडील कोयता काढून त्याचा मित्र असलेल्या सचिन तानाजी बानसे (Sachin Tanaji Banse) (वय.35, रा. रामनगर, वारजे, पुणे) याच्यावर जिवघेणा हल्ला केला. यावेळी त्याने तेथून पळ काढल्याने त्याचा जीव वाचला. यानंतर संशयित धनंजय बोराणे घटनास्थळावरून फरार झाला आहे. त्याच्यावर वारजे पोलिस स्टेशन मध्ये जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दखल करण्यात आला असून, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोज शेडगे (PI Manoj Shedge), पोलिस निरीक्षक (गुन्हे) निळकंठ जगताप (PI Nilkanth Jagtap) यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस उपनिरीक्षक अनिता दुगावकर (PSI Anita Dugaonkar ) तपास करत आहेत.

 

 

फायरिंगची घटना ताजी असतानाच घडलेल्या घटनेने रामनगर मध्ये दहशतीचे वातावरण

बारामती लोकसभा मतदार संघाची निवडणूक (Baramati Loksabha Election) प्रक्रिया पार पडल्यानंतर मतदार संघात असलेल्या वारजे रामनगर भागात गोळीबाराची (Firing in Warje Ramnagar) धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये कोणीही जखमी झाले नसून, 3 हल्लेखोरांवर वारजे पोलिस स्टेशन (Warje Police Station) मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नुकतीच मतदान यंत्रे (EVM Machine) रवाना झाल्यानंतर घडलेल्या घटनेने पोलिस यंत्रणेची धावपळ उडाली होती. सदरील घटनेत दोन अल्पवयीन आरोपींचा सहभाग असून, त्यांना वारजे पोलिसांनी ताब्यात घेतले. तर मुख्य आरोपीला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे.

 

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा

 

https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share

 

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.