Type Here to Get Search Results !

बारामती लोकसभा मतदार संघात मतदान संपल्यानंतर गोळीबाराची घटना; संशयितांचा शोध सुरु

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news, loksabha election, election campaign, pune loksabha, baramati loksabha, shirur loksabha, maval loksabha, election news, political news, business news, Marathi news today

 

Firing incident after polling in Baramati Lok Sabha Constituency; The search for the suspects is underway


 

Firing incident after polling in Baramati Lok Sabha Constituency; The search for the suspects is underway

 

पुणे, दि. 8 मे 2024 (चेकमेट टाईम्स): बारामती लोकसभा मतदार संघाची निवडणूक (Baramati Loksabha Election) प्रक्रिया पार पडल्यानंतर मतदार संघात असलेल्या वारजे रामनगर भागात गोळीबाराची (Firing in Warje Ramnagar) धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये कोणीही जखमी झाले नसून, 3 हल्लेखोरांवर वारजे पोलिस स्टेशन (Warje Police Station) मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नुकतीच मतदान यंत्रे (EVM Machine) रवाना झाल्यानंतर घडलेल्या घटनेने पोलिस यंत्रणेची धावपळ उडाली.

 

 

मंगळवार दि. 7 मे 2024 रात्री 10 वाजून 40 मिनिटांच्या सुमारास, बारामती लोकसभा मतदार संघातील, खडकवासला विधानसभा (Khadakwasla Vidhansabha) क्षेत्रात येत असलेल्या वारजे रामनगर भागात सदरील घटना घडली. येथील भिमशक्ती चौक (Bhimshakti Chowk), पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या प्रणव सुपर मार्केट समोर, पांढऱ्या रंगाच्या स्कूटरवरून आलेल्या तीन जणांनी उभे राहुन लोकांना मोठमोठ्याने शिवीगाळ केली. यावेळी “आम्ही इथले भाई आहे, हा चौक आमचा आहे” असे म्हणत त्यामधील एका लांब बाह्याचा टी-शर्ट घातलेल्या तरुणाने त्याच्या कमरेला पाठीमागील बाजुस पँटमध्ये खोचलेली बंदुक (Pistol) काढून जमिनीच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार (Indiscriminate Firing) करत, 2 गोळ्या झाडुन लोकांमध्ये दहशत पसरवली. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये घडलेल्या या घटनेने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली होती.

 

 

याबाबत माहिती मिळताच वारजे पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) निळकंठ जगताप (PI Nilkanth Jagtap) यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन, परिस्थितीबाबत वरिष्ठांना अवगत केले. यानंतर पुणे शहर पोलिस दलाच्या झोन 3 चे पोलिस उपायुक्त संभाजी कदम (DCP Sambhaji Kadam), कोथरूड विभागाचे सहायक पोलिस आयुक्त भिमराव टेळे (ACP Bhimrao Tele), सहायक पोलिस निरीक्षक रणजीत मोहिते (API Ranajit Mohite), पोलिस उपनिरीक्षक रामेश्वर पारवे (PSI Rameshwar Parve), रामदास भरसट (PSI Ramdas Bharsat) यांनी घटनास्थळाची पाहणी केली. याबाबत वारजे पोलिस स्टेशनचे पोलिस शिपाई हेमकांत पवार (Hemkant Pawar) यांच्या तक्रारीवरून तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान हल्लेखोरांची नावे निष्पन्न झाली असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. बारामती लोकसभा मतदार संघातील निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर अवघ्या काही तासात घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चांना उधान आले आहे. लोकसभा निवडणूक प्रक्रिया सुरु असताना “धाराशिव लोकसभा” (Dharashiv Loksabha) मतदार संघातील भूम (Bhum) तालुक्यात असलेल्या पाटसांगवी (Pat Sangavi) मध्ये झालेला चाकू हल्ला आणि त्यातील एकाचा मृत्यू. तर त्यापूर्वी शिर्डी लोकसभा (Shirdi Loksabha) मतदार संघाच्या वंचित बहुजन आघाडीच्या (Vanchit Bhujan Aghadi) उमेदवारावर नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात (Akole, Ahemadnagar) झालेल्या हल्ल्याने, तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला गालबोट लागले आहे. तर वारजे रामनगर भागात झालेली हि वर्षातील तिसरी घटना आहे. पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत जवळगी (PSI Chandrakant Jawalgi) पुढील तपास करत आहेत.

 

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा

 

https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share

 

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.