Type Here to Get Search Results !

सभा, पदयात्रांमुळे मजुरांचा तुटवडा, अनेक बांधकाम प्रकल्पांचे काम स्थगित; मजुरीही वाढली

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news, loksabha election, election campaign, pune loksabha, baramati loksabha, shirur loksabha, maval loksabha, election news, political news, business news, Marathi news today

 

Labor Shortage Due to Meetings, Padayatras, Many Construction Projects on Hold; Daily Wages also Increased

 

Labor Shortage Due to Meetings, Padayatras, Many Construction Projects on Hold; Daily Wages also Increased

 

पुणे, दि. 2 मे 2024 (चेकमेट टाईम्स): लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha Election) रणधुमाळी मध्ये सभा आणि पदयात्रांमध्ये मजुरांची मागणी वाढलेली (Increased Demand for Labor) आहे. त्यात अगोदरच सुट्ट्या (Holidays) आणि आपल्या गावातील आपल्या मतदानाचा (Voting) हक्क बजावण्यासाठी आपापल्या गावाला मजूर मंडळी गेली आहेत. त्यामुळे मजुरांचा प्रचंड तुटवडा (Severe Labor shortage) निर्माण झाला असून, मजुरीचे दर देखील वाढले (Daily Wages Increased) आहेत. या पार्श्वभूमीवर गुढीपाडवा (Gudhi Padwa) आणि अक्षय्यतृतीयाच्या (Akshaytritiya) मुहूर्तावर सुरु करण्यात आलेले अनेक नवीन जुन्या बांधकाम प्रकल्पांचे काम काही दिवसांसाठी स्थगित (Construction Sites on Hold) करण्यात आले असल्याचे दिसते आहे.

 

 

पदयात्रा आणि सभांमध्ये गर्दी जमवण्यासाठी पैसे देऊन माणसं जमवण्याची पद्धत काही नवीन नाही. मात्र यंदा अगदी उन्हाळ्याच्या सुट्टीत निवडणुका आल्यामुळे अनेकजण दुहेरी संगम साधून आपापल्या गावाला निघून गेले आहेत. या पार्श्वभूमीवर सभा आणि पदयात्रांसाठी ठेकेदारांकडे मजुरांचे आगाऊ बुकिंग (Advance Booking of Labours) होऊ लागले आहे. मात्र कमी असलेल्या मजुरांच्या संख्येमुळे बिगारी महिला आणि पुरुषाला मिळणारा अनुक्रमे 500 आणि 700 रुपये रोज, हा वाढून 700 आणि 1 हजार रुपयांवर गेला आहे. काही ठेकेदारांच्या मजुरांना एका दिवसात दोन वेगवेगळ्या पक्षांचा प्रचार करावा लागत आहे. त्यामुळे त्यांना पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, नाश्ता आणि जेवणाची वेळ असेल तर जेवणाची सोय देखील करून द्यावी लागत असल्याचे काही ठेकेदारांनी चेकमेट टाईम्स’शी (Checkmate Times) बोलताना सांगितले. मात्र यामुळे शहरात मजुरांचा कृत्रिम तुटवडा (Artificial Labor Shortage) निर्माण झाला असून, बांधकाम व्यावसायिक हवालदिल झाले आहेत.

 

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा

 

https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share

 

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.