Type Here to Get Search Results !

सुप्रिया सुळे यांच्या पदयात्रेमुळे आजही शिवणे उत्तमनगर तुंबणार; प्रॉपर्टी टॅक्ससाठी रस्त्यावर उतरलेल्या सुळे वाहतूक कोंडी कधी सोडवणार?

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news

 

Due to Supriya Sule's padayatra, Shivane Uttamnagar will collapse even today; When will the roadblocks for property tax solve the traffic jam?

 

Due to Supriya Sule's padayatra, Shivane Uttamnagar will collapse even today; When will the roadblocks for property tax solve the traffic jam?

 

पुणे, दि. 1 मे 2024 (चेकमेट टाईम्स): आज महाराष्ट्र दिनाची (Maharashtra Din) रम्य सायंकाळ शिवणे उत्तमनगर (Shivane Uttam Nagar) भागातील नागरिकांसाठी मात्र डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. आज बुधवार दि.1 मे 2024 सायंकाळी बारामती लोकसभा (Baramati Loksabha) मतदार संघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या प्रचारार्थ शिवणे मधील शिंदे पूल (Shine Pool) ते कोंढवे धावडे (Kondhave Dhawade) पदयात्रा काढण्यात येणार आहे. मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्यावरून सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांची हि पदयात्रा मार्गक्रमण करणार असून, त्यांचे ठिकठिकाणी फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत होणार आहे. मात्र यामुळे रोज सायंकाळी होत असलेल्या वाहतूक कोंडीत (Traffic Jam) या पदयात्रेमुळे भर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

 

काही दिवसांपूर्वी या भागात प्रचारासाठी आलेल्या अजित पवारांच्या (Ajit Pawar) ताफ्यामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता वर्तवणारे वृत्त चेकमेट टाईम्सने प्रसिद्ध केल्यानंतर नागरिकांनी स्वत:ची कामे सायंकाळच्या आत उरकून घेत, सायंकाळी रस्त्यावर येणे टाळले होते. त्यातच वाहतूक पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त लावला होता. त्यामुळे अपरिहार्यतेमुळे रस्त्यावर आलेल्या वाहनांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करण्याची वेळ आली नाही. मात्र पालकमंत्री (Guardian Minister) असलेल्या अजित पवारांच्या ताफ्यासाठी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त होता. त्यातच चेकमेट टाईम्सच्या वृत्ताची दखल घेत, अजित पवारांनी आपला ताफा (Ajit Pawar Convoy) कमीत कमी वेळ मुख्य रस्त्यावर राहील, ताफ्यामुळे नागरिकांना त्रास सहन करण्याची वेळ येणार नाही याची काळजी घेण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे देखील नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास झाला नाही. मात्र आज हि पदयात्रा आणि ती देखील वाजतगाजत असणार, पदाधिकारी कार्यकर्ते गर्दी करणार, ठिकठिकाणी सुळे यांचे स्वागत होणार, फटाक्यांची आतषबाजी होणार त्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू शकतो.

 

 

त्यामुळे पुणे महानगरपालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्स (PMC Pune Property Tax) मध्ये सवलत मागण्यासाठी शिवणे मध्ये मोर्चा निघतो, कर्वेनगर मधला दुसरा उड्डाणपूल (Karvenagar Fly Over) रद्द झाल्याचे आंदोलन होते, त्यात खासदार सुप्रिया सुळे सहभागी होतात. मात्र त्यापेक्षा गंभीर मुद्दा असलेल्या वारजे ते उत्तमनगर पट्ट्यातील रोजच्या वाहतूक कोंडीवर कोणीच का मोर्चा काढला नाही? आंदोलन केले नाही? (Protest for Road Winding) असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातोय. या भागातील गोरगरीब सामान्य जनतेचा प्रॉपर्टी टॅक्स पेक्षा अधिक पैसा रोजच्या वाहतूक कोंडीमध्ये होत असलेल्या पेट्रोल, डीझेल आणि सीएनजीच्या अपव्ययातून खर्ची पडत आहे. इंधनाचा अतिरिक्त वापर झाल्याने एकीकडे अधिक इंधन लागून अगिक पैसे जात असताना, दुसरीकडे प्रदूषणाचा (Air Pollution) त्रास होऊन, प्रदूषणामुळे होणारे आजार बळावून शारीरिक व्याधी आणि त्यांच्यावर वैद्यकीय उपचारासाठी अधिक खर्च करावा लागत आहे. यामुळे प्रॉपर्टी टॅक्स पेक्षा वाहतूक कोंडीचा मोठा त्रास असल्याचे या भागातील सामान्य मतदार दररोज बोलत आहेत.

 

 

वारजे हायवे चौकापर्यंत झालेले रुंदीकरण आणि सिमेंट कॉंक्रीटचा रस्ता हा JNNURM या केंद्राच्या योजनेतून, सुरेश कलमाडी (Suresh Kalmadi) यांच्या काळात झाला. मात्र त्यानंतर या भागात केंद्राच्या निधीतून रस्ते झाले नाहीत. हि योजना 3 डिसेंबर 2005 रोजी पंतप्रधान मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांच्या हस्ते अधिकृतपणे सुरु करण्यात आली होती. शहरांमधील जीवनमान आणि पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी एक कार्यक्रम म्हणून हि योजना 2005 मध्ये 7 वर्षांच्या कालावधीसाठी (मार्च 2011 पर्यंत) शहरांना त्यांच्या नागरी सेवा स्तरांमध्ये टप्प्याटप्प्याने सुधारणा करण्यासाठी पावले उचलण्यास प्रोत्साहित करण्यासाठी सुरू करण्यात आली होती. JNNURM हे एक मोठे मिशन होते जे मुख्यतः भारतीय शहरांवर भर देऊन शहरी समूह विकासाशी संबंधित होते. त्यामुळे काही काळ या भागातील वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका झाली होती. मात्र त्यानंतर वाढलेल्या नागरीकरणाबरोबर रस्त्यांची रुंदी मात्र वाढली नाही. सुदैवाने शिंदे पूल ते कोंढवे धावडे हा रस्ता सिमेंट कॉंक्रीटचा झाला, तेथेही रुंदीकरण झाले. या भागातील नागरिकांचा काही काळ सुखावह झाला. मात्र झपाट्याने वाढलेल्या लोकसंख्येमुळे ते रस्ते आता अपुरे पडू लागले आहेत. दुर्दैवाने या रस्त्याचा दर्जा देखील राखला गेला नाही. अवघ्या सहा वर्षात या रस्त्याची चाळण झाली आहे. या पावसाळ्यानंतर तर हा रस्ता सिमेंटचा होता आणि त्याला फक्त सहा वर्ष झालीत यावर नागरिकांचा विश्वास बसणार नाही. त्यामुळे पावसाळ्यानंतर तर या रस्त्यावरील वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

 

एकूणच 2004 पासून मधल्या फडणवीस सरकारच्या (Fadnavis Sarkar) काळातील 5 वर्ष आणि एकनाथ शिंदे सरकारच्या (Shinde Sarkar) काळातील काही महिने वगळता अजित पवार पुण्याचे पालकमंत्री आहेत. 2009 पासून सुप्रिया सुळे या भागाचे केंद्रात नेतृत्व करतात. 2014 पर्यंत मनमोहन सिंग यांचे सरकार केंद्रात होते. 2014 पासून केंद्रात मोदींची (Modi Sarkar) सत्ता आहे. पुणे महानगरपालिकेत 2017 पर्यंत राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस (Congress NCP Alliance) ची सत्ता होती. हि गावे पालिकेत गेली तेव्हापासून भाजपाची सत्ता पालिकेत होती. तेव्हा केंद्रात पण भाजपा होती. या गावांचे आमदार पण भाजपाचे आहेत. तरीही आमची गैरसोय का असा सवाल येथील नागरिकांकडून उपस्थित केला जातोय.

 

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा

 

https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.