Type Here to Get Search Results !

आंबेडकर जयंती निमित्त बावधनमध्ये चार दिवसीय 'भीम फेस्टिवल'; उमेश कांबळे यांच्या पुढाकारातून आयोजन

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news

 




 

Four-day 'Bheem Festival' in Bavadhan on the occasion of Ambedkar Jayanti; Organized by the initiative of Umesh Kamble

 

पुणे, दि. 16 एप्रिल 2024 (चेकमेट टाईम्स): विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती (Dr. Babasaheb Ambedkar Mahotsav Samiti), अखिल बावधन विकास प्रतिष्ठान (Akhil Bavdhan Vikas Pratishthan) व सुजाता महिला मंडळ (Sujata Mahila Mandal) यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त चार दिवसीय 'भीम फेस्टिवल (Bhim Festival) 2024’ चे आयोजन करण्यात आले होते. आयोजक उमेश कांबळे (Umesh Kambale) यांच्या पुढाकारातून सिद्धार्थनगर, बावधन बुद्रुक (Siddhartha Nagar Bavdhan) येथे 11 ते 14 एप्रिल 2024 दरम्यान भीमगीते, शाहिरी जलसा, लाईव्ह कॉन्सर्ट व भव्य मिरवणुकीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.

 

 

महोत्सवाची सुरुवात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले (Mahatma Jyotiba Phule) यांच्या जयंतीनिमित्त त्यांना पुष्पहार अर्पण करून व सामुदायिक बुद्ध वंदना (Buddha Vandana) घेऊन व झी युवा संगीत सम्राट फेम अजय देहाडे (Ajay Dehade) प्रस्तुत 'काळजावर कोरले नाव' या लाईव्ह कॉन्सर्टद्वारे बुद्ध-भीम गीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम झाला. दुसऱ्या दिवशी संगीतकार जॉली मोरे व शाहीर सीमा पाटील यांचा भारतीय संविधानाची गौरवगाथा सांगणारा 'वुई द पीपल' (We The People) या शाहिरी जलसाचे सादरीकरण झाले. तिसऱ्या दिवशी विशाल-साजन यांचा लाईव्ह कॉन्सर्ट’चा (Vishal Sajan Live Concert) बावधनकरांनी आनंद लुटला. तर या कार्यक्रमाची सांगता भव्य मिरवणूकीने करण्यात आली. मिरवणुकीत संपूर्ण बावधनकर, आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तसेच भीम फेस्टिवलची सांगता मिरवणूक झाल्यानंतर सर्वांना अन्नदान करून सांगता करण्यात आली.

 

 

रिपब्लिकन पक्षाचे नेते परशुराम वाडेकर (Parshuram Wadekar) व विजय बापूसाहेब डाकले (Vijay Dakale) यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन झाले. हिंजवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक (Hijewadi Police Station) कन्हैया थोरात (PI Kanhaiya Thorat), गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक सोन्याबापु देशमुख (PI Sonyabapu Deshmukh), बावधन पोलीस चौकीचे पोलिस उप निरीक्षक सोमनाथ पांचाळ (PSI Somnath Panchal), राकेश सरडे, मनोज गोसावी, राजेंद्र कुरणे, इंस्टाग्राम स्टार भीमकन्या दिव्या शिंदे (Reel Star Divya Shinde) यांनी महोत्सवाला सदिच्छा भेट दिली. यावेळी माजी सरपंच वैशाली कांबळे, स्वराज कांबळे, रेखा सरोदे,  आशा भालेराव, विशाल शेळके, नामदेव ओव्हाळ, बाळासाहेब खंकाळ, वसंतराव ओव्हाळ, अमोल जगताप, केशवराव पवळे, सचिन टाकले, अर्चना चंदनशिवे, बाबासाहेब तुरुकमारे, सुनील वडवेराव, बाळकृष्ण कांबळे, आनंदा कांबळे आदी उपस्थित होते.

 

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा

 

https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share

 

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.