Type Here to Get Search Results !

मुळशी तालुक्याच्या 45 गावांचा वीजपुरवठा खंडित; सुरळीत होण्यास लागणार एवढा वेळ

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news


 


Electricity supply cut to 45 villages of Mulshi taluka; Time to settle down


 

Electricity supply cut to 45 villages of Mulashi taluka; Time to settle down

 

पुणे, दि. 16 एप्रिल 2024 (चेकमेट टाईम्स): महापारेषण (Maha Pareshan) कंपनीच्या 220 केव्ही टॉवर लाइनची दोनपैकी एक वीजवाहिनी तुटल्याने पिरंगुट (Pirangut) 220 केव्ही व हिंजवडी (Hinjewadi) 220 केव्ही उपकेंद्रांचा व पर्यायाने महावितरणच्या (Maha Vitaran) 20 वाहिन्यांचा वीजपुरवठा आज मंगळवार दि. 16 एप्रिल 2024 सकाळी 9 च्या सुमारास बंद पडला (Power Supply Cut Off). परिणामी भुकूम (Bhukum), भूगाव (Bhugaon), पिरंगुट, कोळवण (Kolvan) खोरे, मुठा (Mutha) खोरे आदी मुळशी तालुक्याच्या (Mulshi Taluka) परिसरातील 45 गावांतील सुमारे 65 हजार वीजग्राहकांचा (Electricity Consumers) वीजपुरवठा बंद आहे. हा वीजपुरवठा आज दुपारी 4 वाजेपर्यंत दुरुस्ती काम पूर्ण झाल्यानंतर वीजपुरवठा पूर्ववत होणार असल्याची माहिती महापारेषणकडून देण्यात आली आहे.

 

 

याबाबत महापारेषणला चेकमेट टाईम्स’ने विचारणा केली असता, त्यांच्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, कोकणातील रोहा (Roha, Konkan) येथून महापारेषणच्या कांदळगाव 220 केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्रातून (High Pressure Substation) टॉवर लाइनद्वारे पिंरगुट व हिंजवडी येथील महापारेषणच्या 220 केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्राला वीजपुरवठा करण्यात येतो. मात्र कांदळगाव 220 केव्ही टॉवर लाइनची एक वीजवाहिनी आंबेगाव (ता. मुळशी) येथे मंगळवार दि. 16 सकाळी 9 वाजून 10 मिनिटांच्या सुमारास तुटली. त्यामुळे पिरंगुट व हिंजवडी अतिउच्चदाब उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद पडला आहे. तर या उपकेंद्रांवर अवलंबून असलेल्या महावितरणच्या सुमारे 20 वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा देखील खंडित झाला. त्यामुळे मुळशी तालुक्यातील भूगाव, भूकूम पिरंगूट, बुरावडे (Burawade), कोळवण खोरे, मुठा खोरे, पौड (Paud), माले (Male), माण (Man), मारूंजी (Marunji), कासारसाई (Kasarsai), नेरे (Nere), दत्तवाडी (Dattawadi), हिंजवडीचा काही भागासह 45 गावांतील सुमारे 65 हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे.

 

 

महापारेषणची अतिउच्चदाब वीजवाहिनी तुटल्याने 70 मेगावॅट विजेची पारेषण तूट निर्माण झाली आहे. मात्र तापलेल्या उन्हामुळे विजेची मागणी वाढत आहे. त्यात 70 मेगावॅट विजेचे भारव्यवस्थापन करून पर्यायी वीजपुरवठा उपलब्ध करून देणे तांत्रिकदृष्ट्या अशक्य आहे. त्यामुळे महापारेषणकडून तुटलेल्या अतिउच्चदाब वीजवाहिनीच्या दुरूस्ती कामाला वेग देण्यात आला आहे. दुपारी 4 वाजेपर्यंत तुटलेल्या वीजवाहिनीचे दुरुस्ती काम पूर्ण होईल व साधारणतः 5 वाजेपर्यंत टप्प्याटप्प्याने मुळशी तालुक्यातील 45 गावांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येईल, असे महावितरण कडून चेकमेट टाईम्स’ला (Checkmate Times) कळवण्यात आले आहे.

 

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा

 

https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share

 

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.