Type Here to Get Search Results !

अजित पवारांनंतर सुनेत्रा पवारांना देखील वारजेच्या वाहतूक कोंडीचा फटका

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news


 

After Ajit Pawar, Sunetra Pawar is also affected by the traffic jam in Warje


After Ajit Pawar, Sunetra Pawar is also affected by the traffic jam in Warje

 

पुणे, दि. 2 एप्रिल 2024 (चेकमेट टाईम्स): बारामती लोकसभा (Baramati Loksabha) मतदार संघाच्या राष्ट्रवादी अजित पवार (NCP Ajit Pawar) गटाच्या उमेदवार सुनेत्रा अजित पवार (Sunetra Ajit Pawar) यांना वारजे माळवाडी मधील वाहतूक कोंडीचा (Warje Malwadi Traffic Jam) फटका बसल्याचे पाहायला मिळाले. काही दिवसांपूर्वी शिवणे (Shivane) मध्ये आलेल्या अजित पवारांना देखील या रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा फटका बसला होता. त्यात अडकून अनेक चाकरमानी आणि शालेय विद्यार्थ्यांचे (Students & Working Peoples) हाल झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे हाच का वारजे शिवणेचा विकास असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो आहे.


 

 

सोमवार दि.1 एप्रिल 2024 सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत जवळपास 14 तासांचा दौरा सुनेत्रा पवार यांनी वारजे माळवाडी भागात केला. यामध्ये जवळपास 30 प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या घरी गाठीभेटी आणि 7 सोसायट्यांमध्ये घोंगडी बैठकांचे (Society Meetings) आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे या दौऱ्यात महायुती (Mahayuti) मध्ये नसलेल्यांच्या घरी भेटी देणे हे प्रमुख उद्यीष्ठ्य असल्याचे दिसले. त्यात काही महाराज आणि मंदिरांचा अंतर्भाव देखील करण्यात आला होता. एकूणच प्रचाराच्या दौऱ्याबाबत तशा नवख्या म्हटल्या जात असलेल्या सुनेत्रा पवारांच्या चेहऱ्यावर तब्बल 14 तासांच्या दौऱ्यानंतर देखील दमल्यासारखे हावभाव मात्र पाहायला मिळाले नाहीत. त्यामुळे त्या प्रचंड उर्जा आणि मनात जिद्द घेऊन (Great Energy and Determination in Mind) बारामतीच्या मैदानात उतरल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे.


 

 

शाळेच्या वेळात उमेदवारांच्या ताफ्याने वाहतुकीची कोंडी

वेळ बरोब्बर दुपारी 12 वाजण्याची, बारामती लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार असलेल्या सुनेत्रा अजित पवारांचा ताफा नेमका याच वेळेत यशोदीप शाळा (Yashodeep School) आणि स्मिता पाटील शाळा (Smita Patil School) असलेल्या रस्त्यावर आला. येथे 4 ते 5 कुटुंबांमध्ये गाठीभेटी होत्या. त्यामुळे या रस्त्यावर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली. त्यामध्ये अनेक विद्यार्थी आणि पालक या कडक उन्हाच्या वाहतूक कोंडीत अडकून पडले. नेमकी आता इयत्ता नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरु झाल्या आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीत अडकलेले पालक आणि विद्यार्थी चिंताग्रस्त झाल्याचे पाहायला मिळाले. त्यातच ताफ्याबरोबर असलेले एकच वाहतूक पोलिस (Traffic Police) ती वाहतूक कोंडी फोडण्यात असमर्थ ठरत होते. त्यामुळे प्रचारकांनी किमान शाळांच्या वेळांमध्ये (Election Campaign in School Time) तरी शाळांच्या रस्त्यावर प्रचार करणे टाळावे अशा अपेक्षा पालकांमधून समोर आल्या आहेत.


 

 

वाहतूक कोंडी झाल्याने चालत निघाल्या सुनेत्रा पवार

वारजे माळवाडी मधील अरुंद रस्ता असलेल्या यशोदीप चौक (Yashodeep Chowk) ते वारजे माळवाडी बस स्टॉप (Warje Malwadi Bus Stop) पर्यंत ज्यांच्या भेटी गाठी घ्यायच्या आहेत, त्यांच्या घरी जाताना सुनेत्रा पवार यांनी वाहतूक कोंडीमुळे चालत जाणे पसंत केले. यावेळी भर दुपारी बारा ते एकच्या दरम्यानच्या कडक उन्हात त्यांच्यामागे चालताना पदाधिकारी कार्यकर्त्यांची तारांबळ झाली. यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार (NCP Sharadchandra Pawar) गटात असलेल्या सचिन दोडके (Sachin Dodke) यांच्या घराजवळ झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीत सुनेत्रा पवार यांना दुकानांसमोरील कट्ट्या ओट्यावरून मार्ग काढत असताना, वाहने मार्गस्थ होत नसल्याने थांबून राहण्याची वेळ आली.

 


After Ajit Pawar, Sunetra Pawar is also stuck in traffic jam in Warje


 

उपमुख्यमंत्री अजित पवारांना देखील बसला होता वाहतूक कोंडीचा फटका

बुधवार दि. 27 मार्च 2024 सकाळी सकाळी चाकरमान्यांना कामाला जाण्याच्या वेळी शिवणे मधील काही पदाधिकाऱ्यांच्या भेटीला आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांना देखील वारजे आणि नवभारत शाळेच्या चौकातील वाहतूक कोंडीचा फटका बसला होता. मोठा पोलिस बंदोबस्त असताना देखील अरुंद आणि खराब रस्ते आणि अतिक्रमणे असल्याने दादांचा ताफा अडकला आणि संथ गतीने पुढे सरसावला होता. तर आता पुढचा जवळपास एक महिना या भागातील नागरिकांना उमेदवारांच्या प्रचारामुळे वाहतूक कोंडीचा फटका बसू शकतो, याच्या चिंतेत नागरिक आहेत.

 


 


निवडणूक आयोगाची गाडी मागे लावून विरोधकांवर दबाव

शुक्रवार दि.29 मार्च 2024 रोजी आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांचा खडकवासला विधानसभा (Khadakwasla Vidhansabha) दौरा होता. यामध्ये देखील पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन गाठी भेटी घेण्यात येत होत्या. मात्र यावेळी आमच्या मागे निवडणूक आयोगाची (Election Commision) गाडी लावण्यात आली होती. स्थानिक पोलिसांचा (Local Police) बंदोबस्त देखील दबावाला होता. मात्र सुनेत्रा पवार यांच्या गाठी भेटींमध्ये निवडणूक आयोगाची गाडी का नव्हती? स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त का नव्हता? असा सवाल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे खडकवासला ग्रामीण अध्यक्ष त्रिंबक मोकाशी (Trimbak Mokashi) यांनी उपस्थित केला आहे. तर निवडणूक विचारांच्या लढाईने होऊ द्या. सर्वाना समान वागणूक द्या, अशा प्रकारची मागणी मोकाशी यांनी केली आहे.

 

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा

 

https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.