Type Here to Get Search Results !

अजित पवारांच्या खडकवासला मतदार संघात भेटीगाठी; सुनेत्रा पवार यांच्यासाठी फिल्डिंग?

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news


Meeting of Ajit Pawar in Khadakwasala Constituency; Fielding for Sunetra Pawar?


 

Meeting of Ajit Pawar in Khadakwasala Constituency; Fielding for Sunetra Pawar?

 

पुणे, दि. 27 मार्च 2024 (चेकमेट टाईम्स): राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून (NCP Ajit Pawar Gat) लोकसभेच्या मैदानात उतरलेल्या रायगड लोकसभेसाठी (Raigad Loksabha) सुनील तटकरे (Sunil Tatkare) आणि शिरूर लोकसभा (Shirur Loksabha) मतदार संघासाठी शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) अशा दोन उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यानंतर आता तिसऱ्या उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) मैदानात उतरले आहेत. त्यांनी आज बुधवार दि.27 मार्च 2024 सकाळी सकाळी बारामती लोकसभा (Baramati Loksabha) मतदार संघात येत असलेल्या खडकवासला विधानसभा (Khadakwasla Vidhansabha) मतदार संघातील जुन्या सहकाऱ्यांच्या भेटीचा सपाटा सुरु केला आहे. या भेटींमधून बारामती लोकसभेच्या उमेदवार सुनेत्रा अजित पवारच (Sunetra Ajit Pawar) असतील यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले असल्याचे दिसते आहे.

 

 

आज सकाळी सकाळी अजित पवारांनी माजी आमदार कुमार गोसावी (Kumar Gosavi) यांची त्यांच्या सिंहगड रोडवरील (Sinhgad Road) निवासस्थानी जात त्यांची भेट घेतली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर त्यानंतर शिवणे (Shivane) भागातील शेखर दांगट (Shekhar Dangat) यांच्या निवासस्थानी जाऊन, दांगट परिवाराची त्यांनी भेट घेतल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. यावेळी त्यांच्यासोबत माजी महापौर दत्तात्रय धनकवडे (Datta Dhankawade), शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे खडकवासला विधानसभा अध्यक्ष प्रदीप धुमाळ (Pradip Dhumal), शेखर दांगट, युवराज मोरे (Yuvraj More), विकास दांगट (Vikas Dangat), अजित दांगट (Ajit Dangat), सुशांत देशमुख, राहुल मोरे, योगेश शेलार, विजय गायकवाड आणि श्रीनिवास शेखर दांगट यांच्यासह शिवणे, उत्तमनगर (Uttamnagar), कोंढवे धावडे (Kondhave Dhawade), न्यू कोपरे (New Kopare) भागातील काही प्रमुख राजकीय, सामाजिक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याचबरोबर आणखीनही काही राजकीय मंडळींना भेटून अजित पवार यांनी सुनेत्रा पवार यांना मदत करण्याची विनंती केल्याची माहिती हाती आली आहे. त्यामुळे बारामती लोकसभा मतदार संघाची उमेदवारी आज कर्वेनगर (Karvenagar) मध्ये आयोजित कुस्तीगीरांच्या मेळाव्यात (Wrestlers Meeting) अजित पवार करू शकतात, असा अंदाजही सूत्रांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

 

 

अजित पवार अडकले वारजेच्या वाहतूक कोंडीत

अजित पवार शिवणे मधील शेखर दांगट यांची भेट घेऊन परतत असताना, वारजे माळवाडी भागात त्याचा ताफा वाहतूक कोंडीत (Ajit Pawar Stuck in Warje Malwadi Traffic Jam) अडकल्याने पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. सकाळी नागरिकांची कामाला जाण्याची वेळ असल्याने या रस्त्यावर वाहतूक कोंडी नित्याची आहे. त्यात आज अजित पवारांचा ताफा या भागात धडकला. त्यांना वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये म्हणून प्रत्येक चौकात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. मात्र व्हायचे तेच झाले आणि अजित पवारांचा ताफा या वाहतूक कोंडीत अडकला. मात्र यावेळी नागरिकांनी “कळू द्या अजित पवारांना पण वाहतूक कोंडीचा त्रास. त्यांच्या लोकांनी किती विकास केलाय. रस्त्यांचे रुंदीकरण झाले नाही, त्यामुळे आम्ही रोज अडकतोय. एक दिवस ते अडकले म्हणून काय झाले.” अशा प्रकारच्या तिखट प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त झाल्या.

 

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा.

https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.