Type Here to Get Search Results !

कर्वेनगर मध्ये बेकायदेशीररित्या पिस्तुल बाळगणारा गुन्हेगार जेरबंद

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news


 

Criminal carrying pistol illegally in Karvenagar jailed

 

Criminal carrying pistol illegally in Karvenagar jailed

 

पुणे, दि. 25 मार्च 2024 (चेकमेट टाईम्स): कर्वेनगर (Karvenagar) मध्ये बेकायदेशीररित्या कमरेला पिस्तुल लावून थांबलेल्या एकाला ताब्यात घेण्यात पुणे शहर पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाला (Anti Extortion Squad Pune Police) यश आले. याबाबत अलंकार पोलिस स्टेशन (Alankar Police Station) मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

याबाबत खंडणी विरोधी पथक 1, गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार कर्वेनगर भागात पेट्रोलिंग (Patroling) करत असताना, पोलीस अंमलदार विजय कांबळे (Vijay Kambale), प्रफुल्ल चव्हाण (Prafull Chavan) यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, एक इसम भुजबळ बंगल्याच्या (Bhujbal Bunglow Karvenagar) बाजूस मोकळया मैदानात कर्वेनगर येथे पिस्तुल बाळगून थांबला आहे. त्याबाबत पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अमोल झेंडे (DCP Amol Zende), सहायक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा सुनिल तांबे (ACP Sunil Tambe) यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील (PI Krantikumar Patil), सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील (API Abhijeet Patil), पोलीस अंमलदार विजय कांबळे, प्रफुल्ल चव्हाण, अमर पवार (Amar Pawar), नितीन कांबळे (Nitin Kambale), रविंद्र फुलपगारे (Ravindra Fulpagare), प्रविण ढमाळ (Pravin Dhamal), संजय भापकर (Sanjay Bhapkar), अमोल आवाड (Amol Awad) यांनी तेथे जाऊन, सापळा रचून संशयित इसमास शिताफीने ताब्यात घेतले.

 

 

ताब्यात घेतलेल्या इसमास त्याचे नाव व पत्ता विचारता त्याने त्याचे नाव सुरज रोहिदास खंडागळे (Suraj Rohidas Khandagale) (वय 30 वर्षे, रा. म्हाडा कॉलनी, वारजे, पुणे) (Mhada Colony, Warje Malwadi) असे असल्याचे सांगितले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्या कंबरेला पाठीमागे 1 देशी बनावटीचे पिस्टल व 2 जिवंत काडतुसे मिळून आल्याने, त्याला ताब्यात घेऊन सदर आरोपी विरूद्ध अलंकार पोलिस स्टेशन मध्ये आर्म अॅक्ट (Arms Act) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

 

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा

 

https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share

 

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.