Type Here to Get Search Results !

कर्वेनगर मध्ये मॉर्निंग वॉल्कला चाललेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news

 

Chain Snatching in Karvenagar

 

Chain Snatching in Karvenagar

 

पुणे, दि. 25 मार्च 2024 (चेकमेट टाईम्स): कर्वेनगर (Karvenagar) मध्ये मॉर्निंग वॉल्कला चाललेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी हिसकावून नेल्याची (Chain Snatching) धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये 1 लाख 50 हजार रुपयांचे मंगळसूत्र चोरट्यांनी चोरून नेले असून, आतापर्यंत झालेल्या चेन स्नॅचिंगच्या घटनांपेक्षा हि घटना वेगळी असल्याचे दिसते आहे. यामुळे या भागात मॉर्निंग वॉल्कला (Morning Walk) जाणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत 71 वर्षीय ज्येष्ठ महिलेच्या तक्रारीवरून वारजे पोलिस स्टेशन (Warje Police Station) मध्ये अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

सदरील फिर्यादी महिला शुक्रवार दि.22 मार्च 2024 रोजी पहाटे पावणे सहा वाजण्याच्या सुमारास मॉर्निंग वॉल्कला बाहेर पडल्या. यावेळी त्या त्यांच्या मैत्रिणीची वाट पाहत कर्वेनगर उड्डाणपुलाखाली (Karvenagar Fly Over) असलेल्या कवितके हॉस्पिटल (Kavitake Hospital) जवळ थांबल्या असताना, दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांपैकी मागे बसलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील 1 लाख 50 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसका मारून चोरी करून नेले. यावेळी त्यांनी आरडओरडा करून मदत मागण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत चोरटे वायू वेगाने पसार झाले. याबाबत वारजे पोलिस स्टेशन मध्ये अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलिस निरीक्षक रणजीत मोहिते (API Ranjit Mohite) पुढील तपास करत आहेत. आतापर्यंत महामार्ग जवळ असलेल्या भागात अशा प्रकारचे चेन स्नॅचिंगचे गुन्हे घडत होते. मात्र यावेळी कर्वेनगर उड्डाणपुलाखाली घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते आहे.

 

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा

 

https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share

 

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.