Type Here to Get Search Results !

उतावळे कार्यकर्ते; मनसे बरोबर युती आणि सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीची खडकवासल्यातून घोषणा?

 Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news

 

 

Hasty activists; Alliance with MNS and announcement of Sunetra Pawar's candidacy from Khadakwasla?

Hasty activists; Alliance with MNS and announcement of Sunetra Pawar's Official Candidate for Baramati Lok Sabha?

 

पुणे, दि. 25 मार्च 2024 (चेकमेट टाईम्स): भाजपाने (BJP) लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर पाचवी यादी जाहीर केली आहे. या यादीत महाराष्ट्रातली आणखी तीन नावं आहे. महायुतीचा (Mahayuti) जागा वाटपाचा पेच वाढत असताना आणि त्यात मनसेही (MNS) येईल का? या सगळ्या चर्चा सुरु असताना महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागापैकी भाजपाने 23 जणांची यादी जाहीर (Maharashtra Loksabha Declared Seats) केली आहे. त्याचबरोबर कॉंग्रेसने (Congress) 11 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. तर शिवसेना उद्धव ठाकरे गट (Shivsena Uddhav Thackeray Gat) आणि एकनाथ शिंदे गट (Shivsena Eknath Shinde Gat), राष्ट्रवादी शरद पवार गट (NCP Sharad Pawar Gat) आणि अजित पवार गट (NCP Ajit Pawar Gat), मनसे, आरपीआय (RPI) आणि इतर घटक पक्षांच्या जागांची घोषणा बाकी आहे. इकडे बारामती लोकसभा (Baramati Loksabha) मतदार संघातील संभाव्य लढतींवर मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहेत. मात्र येथील विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी स्वत:च्या उमेदवारीची केलेली घोषणा वगळता कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराची अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र असे असताना राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या काही पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या उमेदवारीची घोषणाच करून टाकली आहे. ते एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी मनसेला देखील या युतीत घेऊन टाकले आहे.

 

 

35, बारामती लोकसभा मतदार संघातील भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना, आरपीआय आणि घटकपक्षांची नुकतीच एक समन्वय बैठक (Coordination Meeting) वारजे येथे पार पडली. या बैठकीमध्ये खडकवासला भाजपाचे आमदार आणि पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख आणि पदाधिकारी, कार्यकर्ते, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे खडकवासला अध्यक्ष आणि पदाधिकारी, कार्यकर्ते, त्याचबरोबर आरपीआय, मनसे आणि घटक पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. मात्र या बैठकीत लक्ष्य वेधले ते या बैठकीच्या पार्श्वभूमीवर लावलेल्या फलकाने. या फलकावर सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीची कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसताना, “बारामती लोकसभेच्या अधिकृत उमेदवार” (Official Candidate for Baramati Lok Sabha) म्हणून उल्लेख करण्यात आला होता. एवढ्यावरच थांबतील ते उत्साही कार्यकर्ते कसले, त्यांनी ‘मनसे युतीत येण्याची अधिकृत घोषणा झालेली नसताना’, या फलकावर मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे छायाचित्र देखील टाकले होते.

 

 

बारामतीत संभाव्य उमेदवार बदलाची चर्चा

काल अचानक घडलेल्या राजकीय घडामोडींनंतर रासप’चे महादेव जानकर (Mahadeo Jankar) हे महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) कडून नव्हे तर महायुती (Maha Yuti) बरोबर राहूनच निवडणूक लढवणार असल्याची घोषणा झाली. यानंतर आता ते माढा लोकसभा (Madha Loksabha) नव्हे तर परभणी लोकसभा (Parbhani Loksabha) अथवा बारामती लोकसभा (Baramati Loksabha) मधून निवडणूक लढवू शकतात याच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा काय होते याकडे राजकीय अभ्यासकांचे (Political Analyst) लक्ष्य लागले आहे.

 

 

पक्षाकडून आदेश आला नसल्याने सहभागी नाही: कैलास दांगट

भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवार गट या महायुती मध्ये मनसे अद्याप अधिकृत सहभागी झालेली नाही. त्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा नाही. या पक्षांच्या प्रचारात सहभागी होण्याबाबत पक्षाकडून आम्हाला देखील कोणतेही आदेश आलेले नाहीत. त्यामुळे आम्ही कोणत्याही पक्षांच्या प्रचारात अधिकृतपणे सहभागी होऊ शकत नाही. त्याचबरोबर युतीची अधिकृत घोषणा झालेली नसल्याने मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा फोटो अथवा पक्षाचे नाव कोणीही वापरणे गैर असल्याचे मनसे’चे पुणे शहर उपाध्यक्ष कैलास दांगट (MNS Pune City Vice President Kailas Dangat) यांनी चेकमेट टाईम्सशी बोलताना सांगितले.

 

 

आमच्या दृष्टीने सुनेत्रा पवार यांच उमेदवार; मनसे देखील बरोबर

सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा झालेली नसली तरी, आमच्या दृष्टीने सुनेत्रा अजित पवार (Sunetra Ajit Pawar) याच अधिकृत उमेदवार आहेत. त्याचबरोबर मनसे बरोबर बोलणी अंतिम झालेली असून, ते महायुतीत सहभागी होणारच आहेत. त्याबाबत आम्ही मनसेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच नाव आणि छायाचित्र वापरले आहे. एकूणच आम्ही वेळ वाया न घालवता, प्रचाराला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत अजित पवारांच्या विचारांचा उमेदवार बारामतीचा खासदार करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. त्यासाठी महायुतीच्या सर्व घटक पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मनोमिलन करण्यासाठी समन्वयाच्या बैठका आयोजित केल्या जात असल्याचे माजी उपमहापौर दिलीप बराटे (Former Deputy Mayor of PMC Pune Dilip Barate) आणि शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष प्रदीप धुमाळ (Pradeep Dhumal, Former President of the Pune Board of Education) यांनी चेकमेट टाईम्सशी बोलताना सांगितले.

 

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा

 

https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share

 

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.