Type Here to Get Search Results !

सुनेत्रा पवार यांच्या विरुद्ध खडकवासल्यातून देखील शिवसेनेचे बंडाचे निशाण

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news

Shiv Sena revolt against Sunetra Pawar from Khadakwasla too

Shiv Sena revolt against Sunetra Pawar from Khadakwasla too


पुणे, दि. 22 मार्च 2024 (चेकमेट टाईम्स): देशभरात सध्या लोकसभा निवडणुकांचे (Loksabha Elections) वारे वेगाने वाहू लागले आहेत. तसेच चित्र महाराष्ट्रात (Maharashtra Loksabha Elections) देखील दिसत असून, महाराष्ट्रात सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला मतदार संघ म्हणून बारामती लोकसभा (Baramati Loksabha) मतदार संघाकडे पाहिले जात आहे. या मतदार संघात शरद पवार यांच्या कन्या (Daughter of Sharad Pawar) खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) आणि अजित पवार यांच्या पत्नी (Wife of Ajit Pawar) सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्यात समोरासमोर लढत होणार असल्याच्या चर्चा आहेत. या मतदार संघात अद्याप कोणत्याही उमेदवाराची अधिकृत घोषणा (Official Announcement) झालेली नसतानाही सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीवर बंडाचे निशाण (Sign of Rebellion) फडकावले जात असल्याचे प्रमाण अधिक दिसते आहे.

 

 

बारामती लोकसभा मतदार संघातून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर होणार असे दिसत असताना, सुरवातीला इंदापूर विधानसभा (Indapur Vidhansabha) मतदार संघातून पहिले बंडाचे निशाण फडकवण्यात आले. या ठिकाणी हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या (Daughter of Harshwardhan Patil) अंकिता पाटील (Ankita Patil) यांनी मागच्या निवडणुकांमध्ये घडलेल्या घडामोडींवर भाष्य करत, असहकार पुकारला. त्यामागे पुरंदर विधानसभा (Purandar Vidhansabha) मतदार संघातून विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी तर दोन्ही पवारांच्या विरोधात दंड थोपटले आहेत. ते सुनेत्रा पवार पडणारच असा दावा करत आहेत. तर तसेच काही चित्र भोर – वेल्हा – मुळशी विधानसभा (Bhor Velha Mulshi Vidhansabha) मतदार संघातून दिसत आहे. या ठिकाणी थोपटे परिवार (Sangram Anantaro Thopate Family) देखील पवार कुटुंबियांच्या विरोधात नाराज असल्याचे दिसते. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या समोरची आव्हाने वाढत असतानाच, आता खडकवासला विधानसभा (Khadakwasla Vidhansabha) मतदार संघातून देखील शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाच्या (Shivsena Eknath Shinde Gat) पदाधिकाऱ्याने बंडाचे निशाण फडकावले असल्याचे समोर आले आहे.

 

 

बारामती लोकसभा मतदार संघात येत असलेल्या ‘खडकवासला विधानसभा मतदार संघात’ कार्य असलेल्या या पुणे शहर स्तरावरील शिवसेना पदाधिकाऱ्याने आज शुक्रवार दि.22 मार्च 2024 दुपारच्यावेळी सोशल मिडीयावर एक संदेश सामायिक केला. त्यामध्ये लिहिले आहे की, “शिवसेना खडकवासला मतदारसंघातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी पुणे लोकसभाच्या उमेदवारासाठी (Pune Loksabha Candidate) काम करेल. बारामती लोकसभा लोकसभा मतदारसंघात इतर कोणत्याही पक्षाला शिवसेनेची गरज नसल्यामुळे, शिवसेना संपूर्ण ताकतीने पुणे लोकसभा ताकतीने काम करीन. पुढील बैठक उद्या दुपारी (म्हणजे शनिवार दि.23 मार्च 2024) शिवसेना भवन (Shivsena Bhavan Pune) येथून घेऊन, पुणे लोकसभासाठी आपण सर्व जबाबदारी वाटून घेऊ” अशा आशयाचा संदेश हा संदेश आहे. व्हाटस अॅपच्या खडकवासला विधानसभा मतदार संघातील अनेक ग्रुपवर हा संदेश सामायिक करण्यात आला. मात्र त्यावर कोणाकडून अधिक काही चर्चा झाल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे या पदाधिकाऱ्याची नाराजी का आहे? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. त्याचबरोबर शिवसेना शिंदे गटाच्या बंडाने सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीवर कितपत परिणाम होतो? या पदाधिकाऱ्याची मनधरणी करण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवार गटाला यश येते का? का एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचे शहरातील पदाधिकारी या पदाधिकाऱ्याची समजूत काढतात? हे पाहणे देखील औत्सुक्याचे ठरणार आहे.

 

 

विशेष म्हणजे गेल्या काही महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या खडकवासल्यामधील (Shivsena Uddhav Thackeray Gat Khadakwasla) शिवसैनिकांनी आमच्यातील फक्त दोन जण एकनाथ शिंदे गटात गेले असल्याचे चेकमेट टाईम्सशी बोलताना सांगितले होते. तर एक जण एका संघटनेतून शिंदे गटात गेल्याने एकूण तीन जणांचे बलाबल खडकवासल्यातील शिंदे गटाचे झाले होते. त्यातील एकाने हि पोस्ट सामायिक केल्याने शिंदे गटाच्या भूमिकेकडे लक्ष्य लागले आहे. तर परवा रविवार दि.24 मार्च 2024 रोजी दुपारी वारजे (Warje) मध्ये होत असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट, भाजपा, आरपीआय आणि घटकपक्षांच्या समन्वय बैठकीला यातील किती शिवसैनिक हजेरी लावतात हे पाहणे देखील औत्सुक्याचे ठरणार आहे.

 

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.