Type Here to Get Search Results !

स्वातंत्र्यदिनानिमित्त शिवणे उत्तमनगर मध्ये मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, चष्मे आणि औषध वाटप उपक्रमाचे आयोजन

 

पुणे, दि. १८ (चेकमेट टाईम्स): देशाच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पुणे महानगरपालिकेमध्ये नव्याने सामाविष्ट झालेल्या शिवणे उत्तमनगर गावामध्ये रासप युवक अध्यक्ष उमेश कोकरे मित्र परिवाराच्या वतीने मोफत नेत्र तपासणी आणि आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कोकरे यांच्या आरोग्य क्षेत्रातील कामामुळे मोफत शिबिराला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला.

 शिवणे कोंढवेचा नगरसेवक रासप’चाच होईल: आमदार रत्नाकर गुट्टे | उमेश कोकरे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

यामध्ये प्रामुख्याने मोफत नेत्रतपासणी’सह, मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि चष्मे देखील वाटप करण्यात आले. यामध्ये कोंढवे, कोपरे, शिवणे, उत्तमनगर’सह खडकवासला विधानसभा मतदार संघातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. यावेळी सामाजिक, सांप्रदायिक, राजकीय अशा सर्व क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते चष्मा व औषधांचे वाटप करण्यात आले. यावेळी लोकशाहीचा उत्सव साजरा करीत आसताना नागरिकांनाही त्याचा लाभ व्हावा या हेतूने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे असे प्रतिपादन उमेश कोकरे यांनी केले.

 रासप पुणे मनपा निवडणुकीत या या जागा लढवणार; महादेव जानकर यांचे स्पष्ट संकेत

माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्युबवर फॉलो करा...!

आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes

आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आमच्या इंस्टाग्राम’ची लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.