Type Here to Get Search Results !

दसऱ्याच्या मुहूर्तावर काकडे सिटी जवळ महिलेच्या गळ्यातील सोने लुटले

 

पुणे, दि. १६ (चेकमेट टाईम्स): काही दिवसांपूर्वीच एका ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून नेण्याची घटना घडलेल्या काकडे सिटीच्या परिसरात पुन्हा एकदा दुचाकीवरूनच आलेल्या चोरट्यांनी ३९ वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याची माळ हिसकावून नेली असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ऐन दसऱ्याच्या पूर्वसंध्येला घटना घडल्याने परिसरात चर्चेचा विषय झाला होता.

 

काकडे सिटी जवळ ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील हिसकावले


याबाबत सादर महिलेने वारजे पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली असून, वारजे पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र मुंडे पुढील तपास करत आहेत. या घटनेत सोने लुटल्या गेलेल्या महिला गुरुवार दि.१४ ऑक्टोबर २०२१ रात्री ८.३० वाजता काकडे सिटी समोरून जात असताना, दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी त्याच्या गळ्यातील ८० हजार रुपये किमतीचे दागिने हिसकावून नेले आहेत.

 

काकडे सिटी समोर दर आठवड्याला होतंय आंदोलन


वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि युट्युबवर फॉलो करा...!

आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes

आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आमच्या इंस्टाग्राम’ची लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/

आमच्या ट्विटर’ची लिंक : https://twitter.com/checkmate_times

आमच्या डेली हंट’ची लिंक : https://profile.dailyhunt.in/ctnnpune


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.