Type Here to Get Search Results !

पुण्यातील सर्वात मोठ्या स्क्रीनवर भारत पाकिस्तान सामना पाहायला वारजे मधील राष्ट्रध्वजाखाली एकवटणार तरुणाई

 

पुणे, दि. २४ (चेकमेट टाईम्स): भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याची उत्कंठा शिगेला पोचली असताना, क्रिकेट शौकिनांना एक आनंदाची बातमी नगरसेवक सचिन दोडके यांनी दिली असून, वारजे मधील राष्ट्रध्वजाखाली तब्बल २० फुट रुंद आणि १२ फुट उंचीच्या एलईडी स्क्रीनवर क्रिकेटचा सामना पाहता येणार आहे. त्यामुळे आज रविवार दि.२४ ऑक्टोबर २०२१ सायंकाळी राष्ट्रध्वजाखाली क्रिकेट शौकीनच नाही तर प्रत्येक देशभक्त आनंद साजरा करायला एकवटेल असा अंदाज वर्तवला जात आहे.

 

वारजेतील भव्य राष्ट्रध्वजाचे २३ जानेवारीला शरद पवार यांच्या हस्ते लोकार्पण; पहा फर्स्ट लुक


भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यांची एकूण आकडेवारी

भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत एकूण ८ टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. यादरम्यान भारतीय संघाचा वरचष्मा होता. जिथे भारताने 6 सामने जिंकले, पाकिस्तानला फक्त एकदाच जिंकता आले. एका सामन्याचा निकाल लागला नाही. त्याचबरोबर भारत आणि पाकिस्तान एकदिवसीय सामन्यात 132 वेळा आमनेसामने आले. पाकिस्तानकडे 73 तर भारताच्या नावावर 55 एकदिवसीय सामने आहेत. 4 सामने रद्द झाले. याशिवाय, दोन्ही संघ 59 कसोटीत भिडले, ज्यात भारताने 9 सामने जिंकले आणि पाकिस्तानने 12 वेळा जिंकले. 38 कसोटी अनिर्णित राहिल्या.

 

वारजे बदलतंय; बघा नगरसेवक सचिन दोडके यांच्या कामाबद्दल काय म्हणत आहेत वारजेकर


विश्वचषकातील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यांमध्ये भारताचे वर्चस्व

भारताने पाकिस्तानविरुद्ध बऱ्याच काळापासून विश्वचषकावर वर्चस्व राखले आहे. एकदिवसीय आणि टी-२० विश्वचषकात पाकिस्तानी संघाला भारतासमोर कधीही यश मिळवता आलेले नाही. दोन्ही संघांनी एकदिवसीय विश्वचषकात 7 सामने खेळले आहेत आणि प्रत्येक वेळी भारताने विजय मिळवला आहे. दोघांचा शेवटचा सामना इंग्लंडमध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत झाला होता, ज्यामध्ये भारताने 89 धावांनी विजय मिळवला होता. दुसरीकडे, T20 विश्वचषकात दोन्ही संघ 5 वेळा भिडले असून सर्व सामन्यांमध्ये भारतीय संघाने विजयाचा झेंडा फडकावला आहे. कोलकाता येथे 2016 मध्ये झालेल्या टी-20 विश्वचषकात दोन्ही संघांची शेवटची गाठ पडली होती. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ६ गडी राखून पराभव केला होता.

 

पुण्यात ४ हजार विद्यार्थ्यांनी साकारल्या मानवी राष्ट्रध्वज, जिजाऊ, शिवराय, तान्हाजी प्रतिमा


या पार्श्वभूमीवर देशप्रेमी नगरसेवक सचिन दोडके यांनी जय्यत तयारी केली आहे. भारताच्या भल्यामोठ्या राष्ट्रध्वजाखाली पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तान बरोबरचा सामना भल्या मोठ्या स्क्रीनवर, स्टेडीयमचा फील येणाऱ्या आवाजांसह राष्ट्रध्वजाच्या साक्षीने वारजे माळवाडी, खडकवासला विधानसभा मतदार संघातील नागरिकांसह देशवासीय पाहतील आणि देशाच्या विजयाच्या उत्सवात सहभागी होतील असा विश्वास दोडके यांनी चेकमेट टाईम्स’शी बोलताना व्यक्त केला. एकूणच आज संध्याकाळी वारजे मधील राष्ट्रध्वजाला सलामी द्यायला आणि देशाचा विजयोत्सव साजरा करायला तरुणाई गर्दी करेल याबाबत शंका नाही.

 

रक्त गोठवणाऱ्या थंडीत स्वातंत्र्यदिनी हिमालयावर फडकला तिरंगा


वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि युट्युबवर फॉलो करा...!

आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes

आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आमच्या इंस्टाग्राम’ची लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/

आमच्या ट्विटर’ची लिंक : https://twitter.com/checkmate_times

आमच्या डेली हंट’ची लिंक : https://profile.dailyhunt.in/ctnnpune


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.