Type Here to Get Search Results !

दोन पिस्तुलांसह कोंढवे धावडे मधून एकजण गजाआड


पुणे, दि. २४ (चेकमेट टाईम्स): एनडीए गेट १० नंबर बसस्टॉप पासून एका सराईत गुन्हेगाराला दोन देशी बनावटीचे पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसांसह ताब्यात घेण्यात आले आहे. पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट ३ ने ही कारवाई केली असून, संशयितावर उत्तमनगर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सुभाष नाणेकर रात्रीत झालेला पुढारी नाही; जनतेशी नाळ जोडलेला कार्यकर्ता नगरसेवक व्हावा: कालिदास मोरे


पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट ३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांच्या मार्गदर्शनाखालील पथक मंगळवार दि.२३ नोव्हेंबर २०२१ रोजी उत्तमनगर पोलीस स्टेशन हद्दीत गस्त घालत असताना, पोलीस अंमलदार संतोष क्षीरसागर आणि महेश निंबाळकर यांना खबऱ्याकडून माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले.

 


मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त डॉ रवींद्र शिसवे, गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, गुन्हे शाखेचे पोलीस उप आयुक्त श्रीनिवास घाडगे, गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली, युनिट ३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे, पोलीस अंमलदार संतोष क्षीरसागर, राजेंद्र मारणे, महेश निंबाळकर, विल्सन डिसोझा, संजीव कळंबे, कल्पेश बनसोडे, सुजित पवार, सोनम नेवसे, दीपक क्षीरसागर, प्रकाश कट्टे, राकेश टेकावडे, भाग्यश्री वाघमारे यांच्या पथकाने एनडीए गेट १० नंबर बसस्टॉप जवळ सापळा रचून संशयित नामे अक्षय दिलीप रावडे (वय.२४ रा.किरकटवाडी, पुणे) याला ताब्यात घेण्यात आले.

 

शिवणे उत्तमनगर, कोपरे, कोंढवे धावडे MGP जलशुद्धीकरण प्रकल्पाचा प्रश्न असा मार्गी लागला: सुभाष नाणेकर


यावेळी त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडून दोन देशी बनावटीचे पिस्तुल आणि दोन जिवंत काडतूस असा ८० हजार ४०० रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. त्याच्याविरोधात उत्तमनगर पोलीस स्टेशन मध्ये आर्म अॅकटचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षर रावडे हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर सिंहगड रोड आणि दत्तवाडी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल आहेत.


एनडीए रोड “पाम रोड” होणार; अनिता इंगळे यांच्या उपक्रमाने शिवणे कोंढवे धावडे रस्त्याचे सौदर्य वाढणार


वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि युट्युबवर फॉलो करा...!

 

आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes

आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आमच्या इंस्टाग्राम’ची लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/

आमच्या ट्विटर’ची लिंक : https://twitter.com/checkmate_times


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.