Headlines
Loading...
ठेकेदाराच्या दर्जाहीन कामांमुळे सोनेरी आमदार रमेश वांजळे यांचा होतोय अवमान

ठेकेदाराच्या दर्जाहीन कामांमुळे सोनेरी आमदार रमेश वांजळे यांचा होतोय अवमान

 

पुणे, दि. १७ (चेकमेट टाईम्स): “सरकारी काम आणि दर्जाहीन असून, दुप्पट दाम” अशी अवस्था काही कामांमध्ये पाहायला मिळते. मात्र त्या दर्जाहीन कामांमुळे समाजातील होऊन गेलेल्या मोठ्या विभूतींचा कळत नकळत अवमान होत असतो. असाच एक प्रकार वारजे भागात समोर आला असून, महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला परिचित असलेले श्रावणबाळ, सोनेरी आमदार रमेश वांजळे यांच्या नावाच्या कमानीची नासधूस झाल्याचे पाहायला मिळते आहे.

 

वारजेकरांची दिवाळी झाली गोड, मिळाली लाखोंची बक्षिसे; भारतभूषणचा भूषणावह सोहळा


गेल्या आठ महिन्यांपूर्वी नगरसेविका सायली वांजळे यांच्या प्रयत्नातून या सोनेरी आमदार रमेश वांजळे जॉगिंग ट्रॅक, वाचनालय आणि स्वच्छतागृहाचे लोकार्पण खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आले होते. (त्याबाबतचा व्हिडीओ बातमीच्या शेवटी जोडलेला आहे) मात्र ठेकेदाराच्या निकृष्ठ दर्जाच्या कामांमुळे सध्यस्थितीला या तीनही कामांचा बोजवारा उडालेला दिसतोय. त्यातच वांजळे यांची नुकतीच जयंती झाली. त्यावेळी सर्वसमान्य नागरिकांनी आवर्जून या सोनेरी आमदार रमेश वांजळे जॉगिंग ट्रॅकला भेट दिली आणि नागरिकांच्या लक्षात सदरील फलकाची दुरवस्था आली. यानंतर नागरिकांनी जनतेच्या मनातील निर्भय आवाज म्हणून प्रसिद्ध असलेल्या चेकमेट टाईम्सकडे याबाबत तक्रार केली असता, सदरील कामांची भीषणता समोर आली आहे.

 

शालेय विद्यार्थ्यांनी वारजेच्या वाहतुकीवर बनवला आराखडा; विद्यार्थ्यांना आहे सायकल ट्रॅकची गरज


या सोनेरी आमदार रमेश वांजळे जॉगिंग ट्रॅकच्या कमानीवरील महागडी अक्षरे अक्षरशः निखळून गेली असून, त्यामुळे पूर्ण नाव न दिसता, नावाचा अपभ्रंश होत आहे. त्यामुळे एकप्रकारे थोर विभूती असलेल्या सोनेरी आमदार रमेश वांजळे यांचाच अवमान होत असल्याचे गाऱ्हाणे नागरिकांनी चेकमेट टाईम्सकडे मांडले आहे आणि ते तितकेच खरे आहे. त्याचवेळी तेथील बसथांब्यावर असलेल्या स्वच्छतागृहाची फार मोठी गरज आहे. मात्र ते देखील केवळ आठ महिन्यात आत जावे वाटणार नाही, अशा अवस्थेचे झाले असून, तेथेही दर्जाहीन कामाचा नमुना दिसतो. त्यामुळे पुरुषांसह महिलांना देखील बसेसच्या आडोशाला आपले विधी उरकण्याची दुर्दैवी वेळ आली आहे.

 

एनडीए रोड “पाम रोड” होणार; अनिता इंगळे यांच्या उपक्रमाने शिवणे कोंढवे धावडे रस्त्याचे सौदर्य वाढणार


त्यातच तेव्हा लोकार्पण झालेल्या वाचनालयाची देखील दुरवस्था झाल्याचे दिसते. एकूणच तीनही कामे बहुतांशी एकाच ठेकेदाराने केलीत की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर याकडे पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचे लक्ष नाही का? त्यांनी झालेल्या कामाचा दर्जा तपासाला होता का? अशी निकृष्ठ कामे आढळून आल्यावर संबंधित ठेकेदारावर अधिकारी काय कारवाई करणार? का नागरिकांच्या कररूपी पैशांची नवीन टेंडर काढून उधळपट्टीच करत राहणार? यामध्ये कोणाचे काही लागेबांधे आहेत का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो आहे.

 

नगरसेविका सायली रमेश वांजळे यांचा हातभट्टी गुत्त्यावर हल्लाबोल


याबाबत नगरसेविका सायली वांजळे यांना विचारणा केली असता, सदरील फलकाची दोनदा दुरुस्ती केल्याचे त्यांनी सांगितले. काही खोडसाळ मंडळी माझ्या चांगल्या कामांचे मुद्दाम नुकसान करतात का? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला असून, काहीजण आपल्या कामात जाणूनबुजून विघ्न आणत असल्याचा आरोप वांजळे यांनी केला आहे. मात्र आपण यातून समाजसेवेच्या व्रतातून माघार घेणार नसून ,कोणीही कितीही अडथळे आणले तरी लोकाची कामे करण्यास वांजळे कुटुंबीय बांधील असल्याचे सायली वांजळे यांनी म्हटले आहे.

 

सोनेरी आमदार रमेश वांजळे यांचा आम्ही चालवू वारसा; नगरसेविका सायली वांजळे


वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि युट्युबवर फॉलो करा...!

 

आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes

आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आमच्या इंस्टाग्राम’ची लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/

आमच्या ट्विटर’ची लिंक : https://twitter.com/checkmate_times


0 Comments: