Type Here to Get Search Results !

आळंदी बस बंद झाल्याने वारजे उत्तमनगर भागातील वारकरी संप्रदायाने व्यक्त केली नाराजी

 

पुणे, दि. १५ (चेकमेट टाईम्स): कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर आलेल्या या कार्तिकी एकादशीला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. महाराष्ट्रभरातील काही वारकरी आज मिळेल त्या वाहनाने पंढरीत दाखल झाले. मात्र काही वारकऱ्यांना एसटी बंद असल्याने पंढरपुरला जाता आले नाही. त्यामुळे किमान चला आळंदीला तरी जाऊ असा विचार केलेल्या वारजे पासून शिवणे उत्तमनगर आणि अगदी बहुली पर्यंतच्या गावातील ज्येष्ठ वारकऱ्यांच्या पदरी आजच्या कार्तिकीला घोर निराशा आली.

 

वारजे उड्डाणपुलाजवळ बस ओढ्यात कोसळून अपघात, १८ जण जखमी


नोव्हेंबर २०१८ ला कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर वारजे मधून मोठा गाजावाजा करून सुरु करण्यात आलेली “वारजे – आळंदी” पीएमपीएमएल बससेवा बंद असल्याने वारजे उत्तमनगर भागातील वारकरी संप्रदायाने नाराजी व्यक्त केली आहे. ही बस सुरु झाली तेव्हा वारकऱ्यांनी आनंद व्यक्त केला होता. (त्याबाबतचा व्हिडीओ बातमीच्या शेवटी) मात्र कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ही बससेवा बंद करण्यात आल्यानंतर अद्याप सुरळीत करण्यात आलेली नाही. त्यात निवडणुकांचे वातावरण असल्याने लोकप्रतिनिधींना याकडे लक्ष्य देण्यास वेळ नसल्याची तक्रार वारकऱ्यांनी केली आहे.

 

वारजे माळवाडी मध्ये डोंगरावरून बस ढासळली; सुदैवाने जीवितहानी टळली


वारजे मधून हि बस सुटत असली तरी, तेथून पुढे असलेल्या खडकवासला विधानसभा मतदार संघातील शिवणे, उत्तमनगर ते थेट बहुली गावापर्यंत सर्वच नागरिकांना या बसचा फायदा होत होता. अनेकजण दर एकादशीला आळंदीला जाऊन इंद्रायणी मध्ये स्नान आणि माऊलींचे दर्शन घेत होते. तर जशी वारजे ते आळंदी बससेवा आहे तशीच, वारजे ते देहू मार्गे आळंदी बससेवा सुरु करण्याची मागणी वारकरी संप्रदायातून होऊ लागली होती. मात्र मध्येच आलेल्या कोविड नंतर अगोदर सुरु असलेलीच बससेवा बंद असल्याने पुढच्या मागणीचा विचार तो काय असा विचार करून वारकरी संप्रदाय शांत होता.

 

पीएमपी बस खाली चिरडताना महागडी जग्वार थोडक्यात वाचली; पार्किंग केलेली रिकामी बस धावली उताराने उलटी


आता ही पंढरपुरची एकादशी गेली, मात्र या महिन्याच्या अखेरीस मंगळवार दि. ३० नोव्हेंबर २०२१ रोजी आळंदीची कार्तिकी एकादशी आहे. त्या दिवशी तरी वारजे भागातून आळंदी बसने जाता यावे, अशी इच्छा वारकरी संप्रदायातील मंडळींकडून होऊ लागली असून, निवडणुकांच्या वातावरणात व्यस्त असलेल्या लोकप्रतिनिधींना वारकऱ्यांच्या या मागणीकडे लक्ष्य द्यायला वेळ मिळतो का? तेव्हा देण्यात आलेल्या आश्वासनातील “तेजस्विनी” बस आता तरी चालू होणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

PMPML ई बसेसला ग्रहण, डीझेल पेक्षा महाग, दरमहा ९ लाखांचा तोटा; भविष्यात बसेस फायद्यात जाण्याचा दावा


वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि युट्युबवर फॉलो करा...!

आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes

आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आमच्या इंस्टाग्राम’ची लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/

आमच्या ट्विटर’ची लिंक : https://twitter.com/checkmate_times


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.