Headlines
Loading...
चेकमेट इफेक्ट: विरोधी पक्षनेत्यांच्या सोसायटीतील ४ महिन्यात दोनदा खोदलेल्या भागाची दुरुस्ती

चेकमेट इफेक्ट: विरोधी पक्षनेत्यांच्या सोसायटीतील ४ महिन्यात दोनदा खोदलेल्या भागाची दुरुस्ती

 

पुणे, दि. १५ (चेकमेट टाईम्स): पुणे महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांच्या सोसायटी मध्येच पालिकेच्या खात्यांचा अनागोंदी कारभार सुरु असून, जुलै २०२१ ला मैलावाहीन्या टाकून डांबरीकरण केलेल्या कामांची पुन्हा खोदाई करून अगोदर केलेल्या सदोष कामातील दोष काढण्याचे प्रयत्न करण्यात येत असल्याबाबत चेकमेट टाईम्सने विरोधी पक्षनेत्यांच्या सोसायटीतच पालिकेच्या कामांचा अनागोंदी कारभार; ४ महिन्यात पुन्हा उकराउकरी या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या प्रशासनाने या ठिकाणी तत्काळ दुरुस्ती करत नागरिकांना दिलासा दिला आहे.

 

या राजयोग सोसायटी परिसरातील हा चांगला रस्ता पावसाळी वाहिन्या टाकल्यानंतर खराब झाला होता. त्यामुळे दररोज अपघात होत होते. याबाबत चेकमेट टाईम्सने २ जुलै २०२१ रोजी राजयोग मधील मनमानी पद्धतीने खराब केलेला रस्ता दुरुस्त करा हे वृत्त प्रसारित केले होते. त्यानंतर पुणे महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी या वृत्ताची तातडीने दखल घेतप्रशासनाकडून डांबरीकरण करून घेतनागरिकवाहनचालकांना दिलासा दिला होता. चेकमेट इफेक्ट: राजयोग सोसायटी मधील त्या रस्त्याचे विरोधी पक्षनेत्यांनी केले डांबरीकरण 

 


या ठिकाणी राजयोग दत्त मंदिर ते सकपाळ कॉलनी या टप्प्यात समता सोसायटीच्या प्रवेशद्वारावर काही दिवसांपूर्वी पावसाळी वाहिन्या टाकण्यात आल्या. मात्र त्या टाकण्यात आल्यानंतर संबंधित ठेकेदाराने सदरील रस्ता नियमाप्रमाणे पूर्ववत न करता वरवर कॉंक्रीट टाकून अर्धवट अवस्थेत सोडून दिला होता. त्यामुळे या भागात रस्त्यावरून जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकमहिलांचे अपघात होण्याचे प्रमाण वाढले होते. पुणे महानगरपालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे निष्पाप नागरिकांचा जीव धोक्यात आला होता. त्याचबरोबर पावसाळी वाहिन्या टाकूनही रस्त्यावर पाणी साठत असल्याबाबतचे वृत्त चेकमेट टाईम्सने प्रसिद्ध केले होते. 

 

यानंतर पुणे महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळमाजी नगरसेवक प्रदीप धुमाळ यांनी या वृत्ताची तातडीने दखल घेतअधिकाऱ्यांना सूचना करूनसदरील रस्त्यावर तुकडे तुकडे पॅच न मारतासलग डांबरीकरण करून पूर्ववत करण्याचे आदेश दिले होते. यानंतर प्रशासनाने तातडीने या रस्त्याची दुरुस्ती केली होती. मात्र त्यानंतर आता पुन्हा या ठिकाणी खोदाई करून काम करण्यात आली होती. त्यानंतर चेकमेट टाईम्सने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल घेत, प्रशासनाने त्या ठिकाणी डागडुजी केली आहे. अशाच पद्धतीने इतर कुठेही मनमानी पद्धतीने कामे सुरु असतील, पालिकेच्या पैशांचा अपव्यय केला जात असेल तर नागरिक आमच्या सोशल मिडीयावर संपर्क करू शकतात.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि युट्युबवर फॉलो करा...!

आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes

आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आमच्या इंस्टाग्राम’ची लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/

आमच्या ट्विटर’ची लिंक : https://twitter.com/checkmate_times

0 Comments: