Type Here to Get Search Results !

विरोधी पक्षनेत्यांच्या सोसायटीतच पालिकेच्या कामांचा अनागोंदी कारभार; ४ महिन्यात पुन्हा उकराउकरी

 

पुणे, दि. १० (चेकमेट टाईम्स): पुणे महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांच्या सोसायटी मध्येच पालिकेच्या खात्यांचा अनागोंदी कारभार सुरु असल्याचे समोर आले असून, जुलै २०२१ ला मैलावाहीन्या  टाकून डांबरीकरण केलेल्या कामांची पुन्हा खोदाई करून “अगोदर केलेल्या सदोष कामातील दोष काढण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत.”

 

कार्तिकी एकादशीसाठी पीएमपीएमएल बसचा होणार फायदा, खडकवासल्यातील वारकऱ्यांची भावना


या राजयोग सोसायटी परिसरातील हा चांगला रस्ता पावसाळी वाहिन्या टाकल्यानंतर खराब झाला होता. त्यामुळे दररोज अपघात होत होते. याबाबत चेकमेट टाईम्सने २ जुलै २०२१ रोजी राजयोग मधील मनमानी पद्धतीने खराब केलेला रस्ता दुरुस्त करा हे वृत्त प्रसारित केले होते. त्यानंतर पुणे महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी या वृत्ताची तातडीने दखल घेत, प्रशासनाकडून डांबरीकरण करून घेत, नागरिक, वाहनचालकांना दिलासा दिला होता. चेकमेट इफेक्ट: राजयोग सोसायटी मधील त्या रस्त्याचे विरोधी पक्षनेत्यांनी केले डांबरीकरण

 

कोविड निर्बंध शिथिल झाल्यावर पुण्यात पहिल्यांदाच भजन स्पर्धांचे यशस्वी आयोजन


या ठिकाणी राजयोग दत्त मंदिर ते सकपाळ कॉलनी या टप्प्यात समता सोसायटीच्या प्रवेशद्वारावर काही दिवसांपूर्वी पावसाळी वाहिन्या टाकण्यात आल्या. मात्र त्या टाकण्यात आल्यानंतर संबंधित ठेकेदाराने सदरील रस्ता नियमाप्रमाणे पूर्ववत न करता वरवर कॉंक्रीट टाकून अर्धवट अवस्थेत सोडून दिला होता. त्यामुळे या भागात रस्त्यावरून जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकमहिलांचे अपघात होण्याचे प्रमाण वाढले होते. पुणे महानगरपालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे निष्पाप नागरिकांचा जीव धोक्यात आला होता. त्याचबरोबर पावसाळी वाहिन्या टाकूनही रस्त्यावर पाणी साठत असल्याबाबतचे वृत्त चेकमेट टाईम्सने प्रसिद्ध केले होते.

 

आगामी काळात पुण्यातील तृतीयपंथी समाजासाठी भरीव कामगिरी करणार; बाबा धुमाळ यांची तृतीयपंथीयांना ग्वाही


यानंतर पुणे महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, माजी नगरसेवक प्रदीप धुमाळ यांनी या वृत्ताची तातडीने दखल घेत, अधिकाऱ्यांना सूचना करून, सदरील रस्त्यावर तुकडे तुकडे पॅच न मारता, सलग डांबरीकरण करून पूर्ववत करण्याचे आदेश दिले होते. यानंतर प्रशासनाने तातडीने या रस्त्याची दुरुस्ती केली होती. मात्र त्यानंतर आता पुन्हा या ठिकाणी खोदाई करून काम करण्यात आले असून, रस्ता पूर्ववत करण्यात आलेला नसल्याने या भागातील रहिवाश्यांनी रोष व्यक्त केलाय.

 

वारजे मध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन; कोरोनापासून सुरक्षित राहण्याचे बाबा धुमाळ यांचे आवाहन


याबाबत पुन्हा या भागातील नागरिकांनी चेकमेट टाईम्सकडे तक्रार केली असून, आम्ही त्याची माहिती घेतली असता, या पावसाळी वाहिनीला सदोष पद्धतीने मैलावाहीन्या जोडल्या गेल्यामुळे आठ दिवसातून एकदा तरी त्या ठिकाणी ओव्हर फ्लो होऊन रस्त्यावरून मैलापाणी वाहत होते. त्यामुळे त्याची दुरुस्ती केल्याचे सांगण्यात आले. तर अवघ्या काही महिन्यांपूर्वी टाकण्यात आलेल्या या मैलावाहीन्या चुकीच्या पद्धतीने टाकल्या गेल्याचे समोर येत असून, त्या एका खाजगी घराखालून टाकण्यात आल्याचीही धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे या मैलावाहीन्या आणि पावसाळी वाहिन्या शास्त्रीय पद्धतीने ना टाकता, मनमानी पद्धतीने टाकल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

 

खडकवासला विधानसभेची निवडणूक लढवण्याबाबत पहा काय म्हणाले बाबा धुमाळ


एकूणच दस्तुरखुद्द पुणे महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या असलेल्या दिपाली धुमाळ यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर अशा दुय्यम दर्जाचे काम केले जात असेल तर शहरात कोणत्या पद्धतीने कामे केली जात असतील असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो आहे. यावर नागरिकांनी तीव्र असंतोष व्यक्त केला असून, पुणे महानगरपालिकेचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी अशी कामे कशी खपवून घेतात असाही सवाल नागरिकांनी केला आहे.

 

वारजे आणि हायवे विकासाचे स्वप्न पाहिलेल्या प्रदीप उर्फ बाबा धुमाळ यांच्या कार्याचा थोडक्यात आढावा


वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि युट्युबवर फॉलो करा...!

आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes

आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आमच्या इंस्टाग्राम’ची लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/

आमच्या ट्विटर’ची लिंक : https://twitter.com/checkmate_times

आमच्या डेली हंट’ची लिंक : https://profile.dailyhunt.in/ctnnpune


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.