Type Here to Get Search Results !

राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या पुणे शहर उपाध्यक्षपदी प्रशांत लांडगे



पुणे, दि. ७ (चेकमेट टाईम्स): राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभाग पुणे शहर उपाध्यक्षपदी प्रशांत लांडगे यांची निवड करण्यात आली आहे. त्याबाबतचे पत्र आमदार अॅड जयदेव गायकवाड, शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, पंडित कांबळे, शैलेंद्र जाधव, अरुण काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत लांडगे यांना देण्यात आले. प्रशांत लांडगे यांच्या या निवडीमुळे शहरातील सामाजिक न्याय विभागाची मोट आणखीन घट्ट होण्यास मदत होणार आहे.

 

एनडीए रोड “पाम रोड” होणार; अनिता इंगळे यांच्या उपक्रमाने शिवणे कोंढवे धावडे रस्त्याचे सौदर्य वाढणार


प्रशांत लांडगे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्थापनेपासून पक्षात कार्यरत आहेत. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, तसेच काकासाहेब चव्हाण हे पुणे जिल्हा अध्यक्ष असताना, त्यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा हवेली तालुका म्हणून जबादारी देण्यात आली होती. तर गेली सलग ९ वर्षे खडकवासला विधानसभा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष म्हणून लांडगे यांनी काम केले आहे. त्यांनी पक्षात विविध पदांवर केलेल्या कामांची पोचपावती म्हणून त्यांना हे पद देण्यात आले आहे.

 

वरिष्ठांसह मतदारांनी कामाची पोचपावती दिल्यास, त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही: अनिता इंगळे


राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत पुणे जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा, नेत्रचिकित्सा, शिबिर, मोफत चष्मा, मोफत शस्त्रक्रिया, मधुमेह, रक्तदाब आदी गंभीर आजारांबाबत देखील शिबीरे घेऊन सामान्य जनतेला मोलाची मदत केली आहे. सिलेंडर सहित मोफत गॅस कनेक्शन, गुरांच्या छावणीस मोफत चारा, शालेय चित्रकला स्पर्धा, सायकल स्पर्धा, हाफ पिच डे नाईट क्रिकेट स्पर्धा आदी स्पर्धांसह राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त लोकोपयोगी उपक्रम राबवण्यात लांडगे नेहमीच अग्रेसर असतात.

 

विक्रमी लसीकरण: एका दिवसात, एका परिचारिकेने केले ८५० जणांना लसीकरण; अनिता इंगळे यांनी केले आयोजन


वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि युट्युबवर फॉलो करा...!

आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes

आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आमच्या इंस्टाग्राम’ची लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/

आमच्या ट्विटर’ची लिंक : https://twitter.com/checkmate_times

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.