Headlines
Loading...
वारजे: तिरुपतीनगर आकाशनगर जवळ एका तरुणाला भर सायंकाळी लुटले

वारजे: तिरुपतीनगर आकाशनगर जवळ एका तरुणाला भर सायंकाळी लुटले

 

पुणे, दि.२९ (चेकमेट टाईम्स): वारजे जकातनाक्यावरील तिरुपती नगर आकाशनगर जवळ असलेल्या भागात भर सायंकाळी साडेसातच्या सुमारास तरुणाला लुटल्याची घटना घडली आहे. याबाबत तरुणाने वारजे पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात व्यक्तीच्या विरोधात तक्रार दिली आहे. रात्री अपरात्री मध्यरात्री नव्हे तर सायंकाळच्या वेळेस घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

 

वारजे मध्ये गुन्हेगारी टोळीवर मोक्का; संघटीत गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी शंकर खटके सरसावले


सदरील तरुण राकेश राजभर (वय.२९ रा.आकाशनगर, वारजे, पुणे) शनिवार दि.२७ नोव्हेंबर २०२१ सायंकाळी ७ वाजून २० मिनिटांनी आकाशनगर जवळील सिद्धेश्वर नगरकडे जात असताना, तिरुपती नगर कमानी जवळ एका अज्ञात तरुणाने त्याच्याकडील १ हजार ५०० रुपये रोख आणि मोबाईल असा ऐवज दमदाटी करून काढून घेतला. यानंतर या तरुणाने घाबरलेल्या अवस्थेत वारजे पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर खटके, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमृत मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक स्नेहल जाधव पुढील तपास करत आहेत.

 

वारजे मध्ये अज्ञातांनी मोटारींच्या काचा फोडल्या; रात्रीची संचारबंदी असताना घडलेल्या घटनेने खळबळ


वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि युट्युबवर फॉलो करा...!

 

आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes

आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आमच्या इंस्टाग्राम’ची लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/

आमच्या ट्विटर’ची लिंक : https://twitter.com/checkmate_times


0 Comments: