Headlines
Loading...
वारजे कर्वेनगरचा कल बदलतोय; विरेश शितोळेचा जनाधार वाढतोय

वारजे कर्वेनगरचा कल बदलतोय; विरेश शितोळेचा जनाधार वाढतोय

 

पुणे, दि.२ (चेकमेट टाईम्स): पुणे महानगरपालिकांच्या निवडणुकांची अधिकृत घोषणा झाली नसली तरी पुढच्या काही महिन्यांमध्ये निवडणुका होतील. त्या अनुषंगाने सर्व राजकीय पक्ष आणि इच्छुक मंडळी कामाला लागली असून, जनतेच्या जास्तीत जास्त समोर जाण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न दिसतो. तसाच प्रकार वारजे कर्वेनगर मध्ये देखील दिसत असताना गेल्या सात ते आठ वर्षांमध्ये जनतेसाठी व्यापक प्रमाणात काम करत असताना, त्याचा गाजावाजा न करणाऱ्या राजमुद्रा प्रतिष्ठानच्या विरेश गोरखनाथ शितोळे यांच्या मागे मोठा जनाधार निर्माण होत असलेला पाहायला मिळतोय.

 

पालिकेच्या सीसीटीव्ही’ची सामान्य नागरिकांच्या वसाहतीकडे पाठ; विरेश शितोळे यांनी दिला मदतीचा हात


विरेश शितोळे यांनी राबवलेली कोरोना लसीकरण मोहीम असेल आणि त्यातील “व्हॅक्सीन ऑन व्हील्स” उपक्रम असेल, त्यामुळे शितोळे वारजे कर्वेनगर प्रभाग ३१ मधील घराघरात पोचले आहेत. नव्हे तर ज्येष्ठांच्या आवडत्या तरुण नेतृत्वापैकी एक झाले आहेत. त्यातच नुकत्याच दिवाळी मध्ये त्यांनी गणरायाची छबी असलेली भिंतीवरील घड्याळे घरोघर भेट दिली. यामुळे शितोळे यांचा वावर आता प्रत्येकाच्या घरात, घरातील दिवाणखाण्यापासून स्वयंपाक घर असेल की शयनकक्ष सर्वत्र झाला आहे.

 

सायकल, टॅबलेट, क्रिकेट कीट मिळालेले झाले आनंदी; विरेश शितोळे आयोजित किल्ले स्पर्धांचे बक्षीस वितरण


नवरात्री मध्ये तर महिला हे शक्तीचे रूप असून, महिलांचे पूजन हेच देवीचे पूजन माणून त्यांनी राबवलेला भोंडला, दांडिया आणि कोजागिरीचे उत्सव प्रभागातील महिलांमध्ये वेगळाच उत्साह आणि शितोळेंच्या प्रती सकारात्मकता निर्माण करून गेला. प्रभागातील सर्व सोसायट्यांमध्ये आपली समस्या वेळी अवेळी ऐकून घेणारा आणि ती सोडवण्यासाठी कटीबद्ध असलेला माणसातला माणूस म्हणून शितोळेंची ओळख गेल्या सात ते आठ वर्षांपासून स्पष्ट होऊ लागली आहे.

 

वारजे कर्वेनगर’सह काकडे सिटी मध्ये कोजागिरी उत्साहात; विरेश शितोळे यांचे आणखीन एक दमदार आयोजन


त्याचीच परिणीती म्हणून प्रभागातील सर्व गणेशोत्सव मंडळे असतील की नवरात्री उत्सव मंडळांसह, स्वामी समर्थ मठ, साईबाबा मंदिर या अशा सर्व देवस्थानांकडून शितोळेंना हक्काने कामे सांगितली जात आहेत, कारण ती पूर्ण होत आहेत. काहीजण परीक्षा आल्यावर जसा अभ्यास करतात तसे काही इच्छुक उमेदवार निवडणुका आल्यावर तयारीला लागतात. मात्र विरेश शितोळे हे एक असे व्यक्तिमत्व आहे, जे सातत्याने गेल्या सात ते आठ वर्षांपासून, कोण्याही निवडणूक आणि पदाची अपेक्षा न करता लोकांची कामे करत आहे. अशा व्यक्तीने आगामी निवडणुकीमध्ये लोकप्रतिनिधित्व करावे असे मत प्रभागातील नागरिक व्यक्त करू लागले आहेत.

 

विरेश शितोळे यांची आणखीन एक गरुडझेप, वारजे कर्वेनगर प्रभाग ३१ मधील १० हजार कुटुंबांना दिवाळी भेट


वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि युट्युबवर फॉलो करा...!

 अस्सा भोंडला आम्ही यापूर्वी कधी पाहिला नाही; उडान आयोजित भोंडल्यानंतर महिलांच्या प्रतिक्रिया

आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes

आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आमच्या इंस्टाग्राम’ची लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/

आमच्या ट्विटर’ची लिंक : https://twitter.com/checkmate_times


0 Comments: