Type Here to Get Search Results !

या प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाच्या घरी चोरट्यांनी मारला डल्ला; एवढी रक्कम केली लंपास

 

पुणे, दि.१६ मे २०२२ (चेकमेट टाईम्स): पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संस्था (Famous Construction Company in Pune) असलेल्या मालकाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या चोरट्याने डल्ला मारला असून, (Thiefs Stolen Cash) लाखो रुपयांची रक्कम लंपास केली आहे. याबाबत बांधकाम व्यावसायिकाने डेक्कन पोलीस स्टेशन (Deccan POlice Station) मध्ये तक्रार दिली असून, पोलीस उपनिरीक्षक एम व्ही जाधव (PSI M V Jadhav) पुढील तपास करत आहेत.

 

डेक्कन पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक एम व्ही जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक दर्शनी फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सदरील घटना बुधवार दि.११ मे २०२२ सायंकाळी ६.३० ते शुक्रवार दि.१३ मे २०२२ सकाळी ९ वाजे दरम्यान घडली असून, त्यांच्या पारस बंगल्यात घरकाम करणाऱ्या कामगाराने सुमारे ३ लाख रुपयांची चोरी केल्याची तक्रार दिली आहे. हा कामगार त्यांच्या बंगल्यात २ वर्षांपासून काम करत असून, तो मुळचा आसामचा आहे.

गौतम गोपाल गोआला (वय.२२ मूळ गाव – पिपळागौर, पोस्ट चांदकीला, ठाणा - बजारीचौडा, जि.करीमगंज, राज्य आसाम) (Gautam Gopal Gouala, Karimganj, Asam) असे त्या चोरी करणाऱ्या संशयित घर कामगाराचे नाव असून, त्याला अटक करण्यात आली आहे. गौतम गोपाल गोआला याने आतापर्यंत टप्प्या टप्प्याने ३ लाखांपेक्षा अधिक रक्कम चोरी केल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासात निष्पन्न झाले असल्याचे पोलीस उपनिरीक्षक जाधव यांनी चेकमेट टाईम्सशी बोलताना सांगितले. तर त्याने ही रक्कम त्याच्या गावी पाठवल्याचा अंदाज असून, ते कसे पाठवले आणि इतर बाबतीत तपास सुरु आहे.

 

याबाबत राहुल कंस्ट्रक्शनचे संचालक (Director of rahul Construction) राहुल कुंकुलोळ (वय.४१, रा. प्रभात रस्ता, डेक्कन, पुणे) (Rahul Kunkulol) यांनी डेक्कन पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक एम व्ही जाधव पुढील तपास करत आहेत.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.