Type Here to Get Search Results !

बेकायदेशीर फ्लेक्स बॅनरमुळे नागरिकांचा जीव धोक्यात; सचिन दोडकेंच्या वाढदिवसाचे तर ४०० फ्लेक्स



 Illegal flex banners endanger lives of citizens; 400 flakes for Sachin Dodke's birthday

पुणे, दि.१३ मे २०२२ (चेकमेट टाईम्स): शहर विद्रूप करणाऱ्या बेकायदेशीर फ्लेक्स बॅनरबाबत नेहमीच चर्चा होते. या बेकायदेशीर फ्लेक्स बॅनरबाबत उच्च न्यायालयाच्या निर्देशाला देखील प्रशासनाकडून केराची टोपली दाखवली जात आहे. मात्र प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळे सामान्य नागरिकांचा जीव धोक्यात येऊ लागला असून, जस जशा निवडणुका येतील तसं तसा नागरिकांच्या जीवाचा धोका वाढणार आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

 

असेच पुणे शहरातील वारजे माळवाडी परिसरात फ्लेक्स वॉर पाहायला मिळत असून, त्याचा प्रत्यय नुकताच नगरसेवक सचिन दोडके यांच्या वाढदिवसानिमित्त आला. जनतेच्या मनातील नगरसेवक म्हणून सचिन दोडके यांना ओळखले जाते. भाजपाची लाट आणि दोन टर्म आमदार असतानाही भिमराव तापकीर यांना दोडके यांनी २०१९ ला घाम फोडला होता. अवघ्या २ हजार ५९५ मतांच्या फरकाने तापकीर विजयी झाले. २०१४ ला तापकीर यांना ६३ हजार ०२६ एवढे लीड होते. त्यातले ६० हजारांपेक्षा अधिक मतांचे लीड तोडत दोडके यांनी उसळी मारल्याने त्यांचा चाहता वर्ग मोठा आहे याबाबत दुमत नाही.

 

मात्र या अतिउत्साही कार्यकर्त्यांनी दोडके यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेले फ्लेक्स बॅनर सामान्य नागरिकांचा जीव धोक्यात घालत आहेत. आपण वर छायाचित्रात पाहत असलेला हा फ्लेक्स बॅनर गोकुळनगर पठार रस्त्याच्या उतारावर लावण्यात आलेला असून, या फ्लेक्स बॅनरमुळे उताराने वेगात आलेल्या वाहनचालकाला खालून चढण चढण्याच्या उद्देशाने वेगात आलेली वाहने दिसत नाहीत आणि त्यामुळे अपघात नित्याचे झाले आहेत. या रस्त्याच्या कोपऱ्यावरच असलेल्या पालिकेच्या खांबाचा आसरा घेत मांडववाल्याने हा बेकायदेशीर फ्लेक्स बॅनर लावला आहे. या आणि परिसरातील अनेक खांबांचा आधार घेत नेहमीच हे स्व-हितदक्ष मांडववाले असे फ्लेक्स बॅनर लावत असतात. मात्र या उतारावर लागणारे फ्लेक्स बॅनर कोणाचातरी जीव घेतल्याशिवाय लागायचे बंद होणार नाहीत की काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय.

 

नगरसेवक सचिन दोडके यांच्या वाढदिवसानिमित्त ४०० पेक्षा अधिक फ्लेक्स बॅनर आणि होर्डींग्जवर अडीच हजारांपेक्षा अधिक समर्थकांचे फोटो झळकले होते. या फ्लेक्स बॅनरमुळे कर्वेनगर पासून कोंढवे धावडे आणि पूर्ण खडकवासला विधानसभा मतदार संघात फ्लेक्स बॅनरचा धुराळा उडाला होता. वारजे मध्ये तर “बड्डे आहे भावाचा, जल्लोष साऱ्या गावाचा” या गाण्यातील ओळींना शोभणारे वातावरण होते. याच दोडके यांचा वाढदिवस माळवाडीचा उरूस म्हणून साजरा केला जात असल्याचे दोडके समर्थक सांगतात. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात फ्लेक्स बॅनर लागत असताना, ‘पुणे महानगरपालिकेच्या त्या तथाकथित प्रशासकाची नजर कुठे आहे?’ असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत असून, “तेरी भू चूप आणि मेरी भी चूप” असे काही धोरण आखले गेले आहे काय? असाही प्रश्न विरोधक विचारू लागले आहेत.

 

एकूणच हे अनधिकृत फ्लेक्स बॅनर लागत राहणार, सामान्य नागरिकांचा जीव टांगणीलाच लागलेला राहणार आणि त्या त्या नेत्यांचे समर्थक मात्र आपण काहीतरी मोठ्ठ केलंय या आवेशात राहणार. त्यात पैसा कमावण्यासाठी नागरिकांचा जीव धोक्यात घालत असलेले स्वार्थी मांडववाले आपल्या मांडवाच्या लाकडांमध्ये लोकांची चिता जाळायला कमी नाही करणार आणि पालिकेचा आकाशचिन्ह विभाग काहीतरी नवीन आजारपण काढून, कारवाई करण्याचे कधीपर्यंत टाळणार? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.