Type Here to Get Search Results !

जे कधीच जनतेमधून निवडून आले नाहीत, असे लोक आता लोकप्रतिनिधींना पोकळ धमक्या देत आहेत: चित्रा वाघ



दि.२३ जून २०२२ (चेकमेट टाईम्स): महाराष्ट्रात सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोडींमुळे वातावरण तापलं आहे. दरम्यान, आज शिवसेनेनं मविआतून बाहेर पडलं पाहिजे असं वाटतं असेल, तर 24 तासांत मुंबईत या आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी  चर्चा करा, असं थेट आव्हान शिवसेना नेते संजय राऊत  यांनी बंडखोर आमदारांसह एकनाथ शिंदेंना केलं आहे. खासदार राऊत यांच्या या वक्तव्यांवर आता विरोधी गटातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. भाजपच्या चित्रा वाघ यांनी संजय राऊतांना टोला लगावला आहे. ट्वीट करत त्यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे.

यात त्या म्हणतात, तुम्ही पुन्हा निवडून येऊनच दाखवा, असं संजय राऊतांनी शिंदे गटाच्या बंडखोर आमदारांना ओपन चॅलेंज केलं आहे. ज्यांनी आयुष्यात कधी जनतेमधून निवडणूक लढवली नाही कायम मागच्या दाराने राज्यसभेत पोचले ते ऐतखाऊ जनतेमधून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना पोकळ धमक्या देत आहेत, असं म्हणत त्यांनी राऊतांवर हल्लाबोल केला आहे. दरम्यान, आता यावर खासदार राऊत कोणती भूमिका घेणार हे पहावे लागणार आहे. सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर भाजपच्या दिग्गजांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र वाघ यांच्या प्रतिक्रियेमुळे आता भाजप शिवसेना वाद चव्हाट्यावर आला आहे.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84 


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.