Headlines
Loading...
जोपर्यंत वरच्या राजकीय पक्षांचा निर्णय लागत नाही, तोपर्यंत मला राज्याचे प्रभारी मुख्यमंत्री करावे

जोपर्यंत वरच्या राजकीय पक्षांचा निर्णय लागत नाही, तोपर्यंत मला राज्याचे प्रभारी मुख्यमंत्री करावे

 


दि.२३ जून २०२२ (चेकमेट टाईम्स ): सध्या राज्यभरात सत्तेचे महानाट्य चालू असून आता सरकार नेमके कोणाचे येणार? नेमकं काय होणार? कशी सत्तापालट होणार? याकडे सध्या महाराष्ट्राचे नव्हे तर देशभराचे लक्ष लागलेले आहे. मात्र बीडच्या एका युवकाने चक्क राज्यपाल यांना निवेदनामध्ये सध्याचा प्रभारी मुख्यमंत्री मला बनवा. अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्यपालांना निवेदनाद्वारे केली आहे. महाराष्ट्र सरकारमधील सुरू असलेल्या राजकीय नाट्याकडे राज्याचे नव्हे; तर देशभराचे लक्ष लागलेले आहे. तर आता दुसरीकडे बीडमधील श्रीकांत गदळे नावाच्या तरुणाने मला महाराष्ट्र राज्याचे प्रभारी मुख्यमंत्री करा. अशी राज्यपालांकडे मागणी केली आहे. गदळे यांनी याअगोदर देखील एक दिवसाचा मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त करत त्या आशयाचे निवेदन त्यांनी राज्यपालांना पाठवले होते.

सध्या शेतकाऱ्यांपुढे पुन्हा एकदा संकट ओढवण्याची शक्यता आहे. अनेक भागात पाऊस न झाल्याने दुबार पेरणीचे संकट घोंगावत आहे. त्याचबरोबर पावसाळा  सुरू झाला असून, राज्यात अनेक भागात पाऊस झाला तर पुरस्थिती येऊ शकते. त्याचबरोबर इतरही अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे जोपर्यंत वरच्या राजकीय पक्षांचा निर्णय लागत नाही, तोपर्यंत मला राज्याचे प्रभारी मुख्यमंत्री करावे; अशी मागणी बीडच्या श्रीकांत गदळे या तरुणाने राज्यपालांकडे केली आहे. एकीकडे राज्यात राजकीय उलथा पालथ होण्याची शक्यता निर्माण झाली असतांना बीडमधील तरुणाने केलेल्या अनोख्या मागणीने आता राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगलीय.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84 

0 Comments: