Type Here to Get Search Results !

थंड पेयाचे पैसे मागितल्याने पुणेकर गिऱ्हाईक झाले गरम; हॉटेल चालकाला केली मारहाण

 


दि.२4 जून २०२२ (चेकमेट टाईम्स ):  लोहगाव परिसरातील मराठा दरबार हॉटेलमध्ये शीतपेय आणि पाण्याची बाटली घेतल्यानंतर त्याचे पैसे मागितले म्हणून चौघांच्या टोळक्याने हॉटेलच्या व्यवस्थापकालाच बेदम मारहाण केली. यात व्यवस्थापक जखमी झाला आहे. पोलिसांनी चार अज्ञात आरोपींवर गुरुवारी गुन्हा दाखल केला.

याबाबत हॉटेल मराठा दरबारचे व्यवस्थापक संतोष राघेन्द्र शेट्टी (वय ४२, रा. वाघोली, पुणे) यांनी तक्रार दाखल दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेट्टी हे हॉटेल व्यवस्थापक म्हणून उपस्थित असताना चार अनोळखी ग्राहक हॉटेलमध्ये आले. त्यांनी शीतपेय आणि पाण्याची बाटली घेतली. मात्र, त्याचे पैसे देण्याची मागणी केली असता आरोपींनी शिवीगाळ सुरू केली. काही वेळानंतर आरोपींनी एकदमच शेट्टी यांना मारहाण सुरू केली. त्यातील काहींनी शेट्टी यांनी हॉटेलजवळ पडलेल्या दगडांनीही मारहाण केली.

मारहाणीत शेट्टी गंभीर जखमी झाले. आरोपी निघून गेल्यानंतर हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी शेट्टी यांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात उपचार घेऊन परतल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली असून, त्यानंतर अज्ञात चार आरोपींचा शोध घेतला जात आहे. विमानतळ पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक सचिन जाधव याबाबत पुढील तपास करीत आहेत.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.