Type Here to Get Search Results !

लग्नाचे आमिष दाखवून 17 वर्षाच्या मुलीवर बलात्कार; वारजे पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल



दि.२५ जून २०२२ (चेकमेट टाईम्स ): अल्पवयीन युवतीबरोबर प्रेमसंबंध निर्माण करून तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यातून ही युवती गर्भवती राहिल्याचे समोर आले आहे.

याप्रकरणी पाटील इस्टेट येथील एका १७ वर्षांच्या युवतीने वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी राकेश निरगुनकर (वय २३, रा. करमोळी, तानाजी पाटीलनगर, पौड) याच्यावर गुन्हा दाखल केला. हा प्रकार वारजे परिसरातील एका पत्र्याच्या खोलीत राहत असून, पौडमधील तानाजी पाटील नगरातील करमोळी येथे डिसेंबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२ दरम्यान घडला.

राकेश निरगुनकर याने फिर्यादी यांचा पाठलाग करून तिच्याबरोबर ओळख करून घेतली. तिच्याबरोबर प्रेमसंबंध निर्माण केले. मी तुझ्यावर प्रेम करतो, आपण दोघे लग्न करू, असे आमिष दाखवून तिच्यावर वारजे, पौड येथील घरी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यातून ही युवती गर्भवती राहिल्यावर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर या युवतीने पौड पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली होती. तेथून तो वारजे पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करीत आहेत.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.