Type Here to Get Search Results !

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याला २० वर्ष सक्तमजुरीची शिक्षा; पुण्यात झाला होता बलात्कार

 


दि.२५ जून २०२२ (चेकमेट टाईम्स ): : चौदा वर्षांच्या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेत, तिच्यावर लैंगिक अत्याचार करून गर्भवती करणाऱ्या तरुणाला विशेष जलदगती न्यायालयाने वीस वर्षे सक्तमजुरी आणि तीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश के. के. जहागीरदार यांनी हा निकाल दिला.

सागर सतीश सोनवणे (वय २२, रा. हडपसर) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. दोषी व्यक्तीने दंड न भरल्यास दोन वर्षांचा अतिरिक्त सश्रम कारावास भोगावा लागेल, तसेच दंडाची संपूर्ण रक्कम पीडितेला देण्यात यावी, असेही न्यायालयाने निकालपत्रात नमूद केले आहे. आरोपी सागर सोनवणेविरोधात अपहरण, बलात्कार, लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायदा (पॉक्सो) अशा विविध कलमांनुसार वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पीडित मुलीच्या आजीने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. ही घटना जानेवारी ते जुलै २०१९ दरम्यान घडली.

आरोपी व पीडित मुलीची मैत्री होती. आरोपीने पीडितेला लग्नाची मागणी घालून तिच्यासोबत वारंवार शरीरसंबंध ठेवले. त्यातून पीडित मुलगी गरोदर राहिली. दरम्यान, ४ जुलै २०१९ रोजी पीडिता सकाळी साडेसहा वाजता शाळेत गेली. शाळा सुटल्यावर पीडितेच्या आजीने तिला घरी जाण्यास सांगितले. पीडिता घरी आली नाही. पीडितेच्या आजीने नातीचा शोध घेतला. त्यानंतर त्यांनी वानवडी पोलिसांत तक्रार दिली. त्यावेळी पीडितेच्या आईने आरोपीला फोन केला असता, त्याने पीडित मुलगी आपल्यासोबत असल्याचे सांगितले. पीडितेच्या आईने पीडिता व आरोपीला वानवडी पोलिस ठाण्यात येण्यास सांगितले. त्यानंतर पोलिसांनी पीडितेचा जबाब नोंदवित आरोपीला अटक केली. सहायक पोलिस निरीक्षक ज्योत्स्ना पाटील यांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.