Type Here to Get Search Results !

अमरनाथ ढगफुटी: 13 यात्रेकरूंचा मृत्यू, अनेक बेपत्ता; हेल्पलाईन नंबर जारी

 


पुणे दि. 0  जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स):  अमरनाथ यात्रेवेळी हजारो भाविकांची गर्दी असताना गुफेजवळील भागात मोठी ढगफुटी झाली. यात्रेकरूंच्या टेंट असलेल्या क्षेत्रात माती, दगडांचा मोठा लोंढा आला आणि अनेक टेंट वाहून गेले. यामध्ये आतापर्यंत १३ जणांचे मृतदेह सापडले आहेत.

शोधकार्य जोरात सुरु असून एनडीआरएफसह आर्मीच्या रेस्क्यू टीम श्वानपथकांसह काम करत आहेत. अमरनाथ यात्रा आयोजकांनी देखील या घटनेची पुष्टी केली आहे. अमरनाथ गुहेजवळ १० ते १२ हजार भाविक आहेत. सायंकाळी साडे पाचच्या सुमारास ही घटना घडली आहे. स्थानिकांनी अनेक जण वाहून गेल्याचे म्हटले आहे. भाविकांचे, सुरक्षा दलाचे आणि खानपानाचे टेंट वाहून गेल्याचे म्हटले आहे. जवळपास २५ तंबू वाहून गेले आहेत.

अमरनाथ यात्रेकरू आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आले आहेत.

NDRF: 011-23438252, 011-23438253

Kashmir Divisional Helpline: 0194-2496240

Shrine Board Helpline: 0194-2313149 असे हे नंबर आहेत.

एनडीआरएफच्या मदतीला हवाई दलाने हेलिकॉप्टर आणि वैद्यकीय पथके पाठविण्याची तयारी केली आहे. जखमी यात्रेकरूंना हेलिकॉ़प्टरद्वारे एअरलिफ्ट केले जाणार आहे. पुढच्या आदेशांची वाट पाहत असल्याचे एअरफोर्सच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. १० आर्मीची पथके तैनात करण्य़ात आली आहेत.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.